सोयाबीन पेंडच्या आयातीचा नाही प्रस्ताव : पियूष गोयल

सोयाबीन पेंडच्या आयातीचा नाही प्रस्ताव : पियूष गोयल

सोयाबीन पेंडच्या आयातीचा केंद्र सरकारचा प्रस्ताव नसल्याची ग्वाही वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली.
Published on

नाशिक : सोयाबीन पेंडच्या आयातीचा केंद्र सरकारचा प्रस्ताव नसल्याची ग्वाही वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली. राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली. सोयाबीन पेंडची आयात करु नये, अशा मागणीचे निवेदन पटेल यांनी गोयल यांना दिले.
पटेल म्हणाले, की गेल्या वर्षी २० लाख टन सोयाबीन पेंडची निर्यात झाली. पण उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे कुक्कुटपालनसाठी सोयाबीन पेंड कमी पडली.

कुक्कुटपालन व्यवसायातून मागणी झाल्यावर केंद्र सरकारने १२ लाख टन सोयाबीन पेंड आयात करण्यास परवानगी दिली. प्रत्यक्षात सोयाबीन पेंडची आयात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झाली आणि सोयाबीनचे दर कोसळले. यंदा मात्र तशी स्थिती नाही. देशात एक कोटी १७ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. त्यातील १२ लाख टन सोयाबीन पेरण्यासाठी शेतकरी ठेवतील. उरलेल्या १ कोटी ५ लाख सोयाबीनचे गाळप होऊन त्यापासून ८६ लाख टन पेंड तयार होईल. कुक्कुटपालन उद्योगासाठी ६० लाख टन सोयाबीन पेंडची गरज आहे. त्यामुळे सोयाबीन पेंड आयात करण्याची गरज नसल्याची बाब गोयल यांच्यापुढे ठेवण्यात आली.

सोयाबीन पेंडच्या आयातीचा नाही प्रस्ताव : पियूष गोयल
अनिल देशमुख प्रकरण : सिताराम कुंटेंची इडीकडून चौकशी

साडेचार हजार टनाच्या पेंडसाठी आग्रह
जैवतंत्रज्ञानातून उत्पादित झालेल्या सोयाबीनची पेंड साडेचार हजार रुपये भावाने मिळत असल्याने पेंड आयात करण्याची मागणी कुक्कुटपालन उद्योगातून करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र देशात २६ लाख टन अधिकची सोयाबीन पेंड शिल्लक राहणार आहे. जागतिक भावापेक्षा दहा टक्के अधिकचा भाव असल्याने शिल्लक पेंड निर्यात होणार नाही. अशा परिस्थितीत सोयाबीनची पेंड आयात केल्यास शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे. ही माहिती सांगितल्यावर गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तुम्ही ही बाब देशातील शेतकऱ्यांना सांगावी, असे स्पष्ट केले, अशीही माहिती पटेल यांनी दिली. गोयल यांनी सोयाबीन पेंड आयातीचा प्रस्ताव नसल्याचे ट्विट देखील केले आहे.

केंद्र सरकारतर्फे पेंड आयात होणार नसल्याने देशातील शेतकऱ्यांना सोयाबीनला यंदा चांगले भाव अपेक्षित आहेत. क्विंटलचे किमान मूल्य चार हजार रुपये असून शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनला क्विंटलला आठ हजार रुपयांपर्यंतचा भाव अपेक्षित आहे.
- पाशा पटेल (माजी अध्यक्ष, कृषीमूल्य आयोग)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()