तिकीट कापल्याचं कळलं आणि अंगावर पेट्रोल ओतलं, सपाचे नेते आक्रमक

तिकीट कापल्याचं कळलं आणि अंगावर पेट्रोल ओतलं, सपाचे नेते आक्रमक
Updated on

देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षांकडून तिकीट वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात भाजपा, सपा, काँग्रेस आणि बसपाकडून उमेदवारांची पहिली यादीही जाहीर झाली आहे. मात्र, तिकीट वाटपानंतर ठिकठिकाणी बंडखोरांची रांग लागल्याचं चित्र आहे. अनेक पक्षांतर्गत कलह बाहेर निघत असताना एका सपा नेत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. (UP Assembly Election 2022)

समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पक्षाची यादी जाहीर केली. यानंतर पक्षांतर्गत नाराजांची संख्या आपसूकच वाढली आहे. सध्या पक्षांमध्ये तिकीटावरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अलिगढच्या आदित्य ठाकूरने समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. खरं तर अलिगडच्या छारामधून निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने ते संतापले होते. पोलिसांनी त्यांना कसंबसं वाचवलंय.

दोन दिवसांपूर्वी बसपाच्या नेत्यांना रडू कोसळलं

दरम्यान, बसपाचे चरथावल विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी अर्शद राणा (Arshad Rana) यांना तिकिट न मिळाल्याने त्यांना रडू कोसळल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, बसपा नेत्याने तिकिट देण्यासाठी 67 लाख रुपये हडपल्याचा देखील आरोप केला आहे. (UP Assembly Election 2022)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()