SP MLA Mehboob Ali: 'मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे, आता तुमची राजवट संपणार', आमदाराचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

SP MLA Mehboob Ali Video: बिजनौरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले असून, राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.
SP MLA Mehboob Ali  Viral Video
SP MLA Mehboob Ali Viral VideoEsakal
Updated on

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी भाजप सरकारला इशारा देत म्हटले की, आता मुस्लिम लोकसंख्या वाढली असून भाजपची राजवट संपणार आहे. मुघलांनी 800 वर्षे राज्य केले त्यांना कायम सत्तेत राहता आले नाही मग भाजप काय आहे. असा सवालही त्यांनी बोलताना उपस्थित केला.

आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत अली म्हणाले, "2027 मध्ये तुम्ही नक्कीच जाणार आणि आम्ही नक्कीच येणार आहे."

बिजनौरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले असून, राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजप संविधान आणि आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोपही महबूब अली यांनी केला. ते म्हणाले भाजप सरकारमध्ये कायदा नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक राहिली नाही.

SP MLA Mehboob Ali  Viral Video
Sons Killed Mother: देश हादरवणारी घटना! दोन मुलांनी मिळून आईला झाडाला बांधले अन् जिवंत जाळले

कोण आहेत आमदार मेहबूब अली?

महबूब अली हे 2002 मध्ये पहिल्यांदा खंथ मतदारसंघातून आमदार झाले होते. मेहबूब अली यांनी 2007 ची यूपी विधानसभा निवडणूक समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. त्यांनी यामध्ये विजय मिळवत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मंगल सिंग यांचा पराभव केला.

2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. अखिलेश यादव सरकारमध्ये नोव्हेंबर 2015 मध्ये मंत्रिमंडळ फेरबदल करताना त्यांना रेशीम आणि वस्त्रोद्योग मंत्री करण्यात आले होते. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना लघु पाटबंधारे खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

SP MLA Mehboob Ali  Viral Video
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, भाजपने फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी, 'हा' आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.