Space Tourist
Space Touristesakal

Space Tourist :  भारतीय वंशाचे गोपीचंद रचणार इतिहास, सायंकाळी सात वाजता आकाशात झेपावणार अंतराळयान

एप्रिल 1984 मध्ये रशियन सोयुझ T-11 अंतराळयानातून राकेश शर्मा यांनी ऐतिहासिक प्रवास केला होता
Published on

Space Tourist :

आपण विमानातून इतर ठिकाणी जाऊन मस्त फिरून येतो. तसेच परदेशातील लोक अंतराळाची सफर करण्यासाठी रवाना होणार आहेत. आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे हे यान भारतीय वंशाचे वैमानिक गोपीचंद थोटाकुरा हे चालवणार आहेत.  

भारतीय वंशाचे वैमानिक गोपीचंद थोटाकुरा आज (19 मे) रोजी इतिहास रचणार आहेत. ते जेफ बेझोसच्या मालकीच्या कंपनी ब्लू ओरिजिनच्या व्यावसायिक अंतराळ उड्डाणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हे उड्डाण आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे. या अंतराळ प्रवासात गोपीचंद यांची पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे.

Space Tourist
Spain Tourist Gangraped in Jharkhand: स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक अत्याचार करून बेदम मारहाण; झारखंडमधील संतापजनक प्रकार

अंतराळात अशी कामगिरी करणारे ते दुसरे भारतीय ठरणार आहेत. यापूर्वी 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी ही कामगिरी केली होती. अमेरिकेत राहणारे गोपीचंद यांची ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड-25 (NS-25) मोहिमेसाठी क्रू म्हणून निवड झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जगभरातील इतर पाच अंतराळवीर क्रूमध्ये आहेत.

न्यू शेपर्ड प्रोग्रामसाठी हे मानवांसहीत केलेले सातवे उड्डाण आहे. तर, अंतराळ इतिहासातील 25 वे मिशन आहे. या मोहिमेची उड्डाणाची वेळ भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता ठेवण्यात आली आहे.

Space Tourist
Chennai Tourist Places : चेन्नईमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय, तर या ठिकाणांना नक्की भेट द्या!

उड्डाणाच्या 40 मिनिटांपूर्वी ब्ल्यू ओरिजिनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाँच लाइव्ह स्ट्रीम केले जाईल. यान सुटण्याचे ठिकाण अमेरिकेतील वेस्ट टेक्सास शहरात ठेवण्यात आले आहे.

एप्रिल 1984 मध्ये रशियन सोयुझ T-11 अंतराळयानातून राकेश शर्मा यांनी ऐतिहासिक प्रवास केला होता. यानंतर अंतराळात जाणारे गोपीचंद हे दुसरे भारतीय बनतील. गोपीचंद 31 लोकांच्या विशेष टीमचा भाग आहे, ज्यांना कर्मन रेषा पार करायची आहे. ही रेषा पृथ्वीचे वातावरण आणि बाह्य अवकाश यांच्यातील सीमारेषा आहे.

Space Tourist
Tourist : झणझणीत ठसक्याची चव चाखण्यासाठी एकदा कोल्हापूरला भेट द्या..

कोण आहेत गोपीचंद थोटाकुरा

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जन्मलेले गोपीचंद आज ३० वर्षांचे आहेत. ते एक उद्योजक आणि कुशल पायलट आहे. ब्लू ओरिजिन वेबसाइटनुसार, गोपीचंद एक पायलट आणि एव्हिएटर आहे. व्यावसायिक विमाने उडवण्याव्यतिरिक्त, त्याने बुश, एरोबॅटिक आणि सीप्लेन तसेच ग्लायडर देखील उडवले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जेट पायलट म्हणूनही काम केले आहे.

गोपीचंद, ज्यांनी एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीमधून पदवी पूर्ण केली आहे, त्यांना प्रवासाची आवड आहे. त्याने किलीमांजारो पर्वतावर यशस्वी चढाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()