नवी दिल्ली - अंतराळयानातील (Spacecraft) नादुरुस्त झालेल्या विद्युत उपकरणांची दुरुस्ती (Repairing) आपोआप होणे नजीकच्या भविष्यात (Future) शक्य होणार आहे. नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक भाग (Electronic Parts) आपणहून दुरुस्त होतील, असा पदार्थ भारतीय शास्त्रज्ञांनी (Indian Scientist) विकसित केला आहे. हा पदार्थ त्याच्यामधील यांत्रिक दुरुस्त्या या यांत्रिक परिणामाने उत्पन्न होणाऱ्या विद्युत प्रभारांच्या मदतीने स्वतःहून करू शकेल. (Spacecraft Malfunction will be Repaired Automatically)
कोलकाता येथील आयसर संस्थेने, आयआयटी खडगपुरच्या मदतीने पायझो-इलेक्ट्रिक रेण्वीय स्फटिक विकसित केले आहेत. हे स्फटिक बाह्य मदतीशिवाय स्वतःहून स्वतःच्या यांत्रिक दुरुस्त्या करू शकेल. पायझो इलेक्ट्रिक स्फटिक हे त्यांच्यात यांत्रिक बदल झाल्यास विद्युत प्रभार निर्माण करू शकतात.या घन पदार्थांमध्ये यांत्रिक बदल झाल्यास त्यात विद्युत प्रभार उत्पन्न करण्याचा आगळावेगळा गुणविशेष असल्यामुळें उपकरणाचे तुटलेले भाग, भेगा या ठिकाणी विद्युत प्रभार उत्पन्न होऊन ते उपकरण आपणहून दुरुस्त होऊ शकेल.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्वर्णजयंती फेलोशिपच्या माध्यमातून प्रोफेसर सी. एम. रेड्डी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन मंडळाला या संशोधनासाठी सहाय्य केले आहे. ही पद्धत प्रारंभी प्रा. सी. मल्ला रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता येथील ‘आयसर’मधील संशोधकांनी विकासित केली. रेड्डी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यालयाकडून कडून मिळणाऱ्या स्वर्णजयंती फेलोशिपचे वर्ष २०१५ मधील मानकरी आहेत. आयसरमधील निर्माल्य घोष यांना २०२१मध्ये ऑप्टिकल पोलरायझेशनसाठी सोसायटी ऑफ फोटो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर या संस्थेचे सी. जी. स्टोक्स पारितोषिक मिळाले आहे.
पायझो इलेक्ट्रिक ऑर्गेनिक स्फटिकांच्या अचूकतेच्या मोजमापासाठी त्यांनी अत्याधुनिक पोलारायझेशन मायक्रोस्कोपिक पद्धत वापरली आहे. आयआयटी खरागपुर येथील प्रा. भानू भूषण आणि डॉ. सुमंत करण यांनी शेतीसाठी वापरले जाणारे उपकरणांची यांत्रिक जोडणी करून या नवीन पदार्थाची कामगिरी तपासली आहे.
मानवी हस्तक्षेप अशक्य
अनेक उपकरणे यांत्रिक नादुरुस्तीमुळे बरेचदा बंद पडतात अशा उपकरणांच्या दुरुस्तीची किंवा ते बदलण्याची गरज आपल्याला भासते. त्यामुळे ती उपकरणे ज्याचा भाग आहे त्या वस्तूचे आयुष्य कमी होते व त्याचा देखभाल खर्चही वाढतो. अंतराळ यानासारख्या अनेक ठिकाणी दुरुस्तीसाठी मानवी हस्तक्षेप शक्य नसतो. ही गरज लक्षात घेता हा पदार्थ उपयुक्त ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.