चीनसोबत संबंध सामान्य नाहीत; सीमेवर अजूनही सैन्य : जयशंकर

पूर्व लडाखमध्ये सुमारे दोन वर्षांपासून भारत आणि चीन मध्ये तणाव सुरु होता. या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी उच्चस्तरीय भेटीसाठी भारतात आले आहेत.
Special briefing by EAM Dr S Jaishankar on meeting with Chinese Foreign Minister Wang Yi
Special briefing by EAM Dr S Jaishankar on meeting with Chinese Foreign Minister Wang Yiसकाळ डिजिटल टीम
Updated on

पूर्व लडाखमध्ये सुमारे दोन वर्षांपासून भारत आणि चीन मध्ये तणाव सुरु होता. या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी उच्चस्तरीय भेटीसाठी भारतात आले आहेत. आज त्यांनी सकाळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Dr S Jaishankar) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी माध्यमांना त्यांच्या दरम्यान चर्चा झालेल्या मुद्यांविषयी माहिती दिली.

पूर्व लडाखमधील सीमा वाद प्रश्नावर आम्ही चर्चा केली. पण आमच्यात सर्व ठीक झाले, असे म्हणू शकत नाही. जोपर्यंत सीमा वादचा प्रश्न कायम आहे तोवर सर्व काही ठिक होऊ शकत नाही, असे एस जयशंकर यांनी स्पष्ट केले. या वादाला कसे सोडवावे, याविषयी आम्ही चर्चा केली. चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या. असेही जयशंकर यांनी सांगितले.

या निमित्ताने अफगाणिस्तान आणि युक्रेनसह प्रमुख आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली सोबतच आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली.

Special briefing by EAM Dr S Jaishankar on meeting with Chinese Foreign Minister Wang Yi
Yogi Adityanath: पहाटे तीन वाजता सुरु होतो दिवस, जाणून घ्या दिनक्रम

चीन भारताबाबत स्वतंत्र धोरण अवलंबेल आणि या धोरणांमुळे इतर देश आणि इतर संबंधांवर प्रभाव पडू देणार नाही, अशी आशा जयशंकर यांंनी व्यक्त केली.

चीनमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना कोविड निर्बंधांचे कारण देऊन भारतात परत येण्याची परवानगी नाही,या चर्चा केल्याचे एस जयशंकर म्हणाले. अनेक तरुणांच्या भविष्याचा विचार करता चीन भेदभावविरहीत भुमिका बजावतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.