POCSO न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांची आत्महत्या; पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

त्यांचे कुटुंबीय बाहेरून परत आले असता न्यायाधीश पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
Cuttack POCSO Court Judge Subhash Kumar Bihari
Cuttack POCSO Court Judge Subhash Kumar Bihariesakal
Updated on
Summary

त्यांचे कुटुंबीय बाहेरून परत आले असता न्यायाधीश पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

कटक : कटक पॉक्सो न्यायालयाचे (Cuttack POCSO Court) विशेष न्यायाधीश सुभाष कुमार बिहारी (Judge Subhash Kumar Bihari) यांनी शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केलीय. त्यांचा मृतदेह शासकीय निवासस्थानातील पंख्याला दोरीच्या साहाय्यानं लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना घडली, तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलं घरी नव्हती.

न्यायाधीशांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट

त्यांचे कुटुंबीय बाहेरून परत आले असता न्यायाधीश पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सुभाष यांना खासगी वैद्यकीय केंद्रात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक तपासात मृत्यूचं कारण समजू शकलं नाहीय. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश सुभाष दोन दिवसांच्या रजेवर होते. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांनी स्टेनोला बोलावून रजा वाढवण्यास सांगितलं होतं.

Cuttack POCSO Court Judge Subhash Kumar Bihari
BJP : भाजप खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारींसह 9 जणांविरुद्ध गुन्हा

एसीपींकडून घटनास्थळाची पाहणी

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले एसीपी तापस प्रधान यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तेथून जप्त केलेली दोरी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं असून, त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. न्यायाधीशांचा धाकटा भाऊ सुबोध कुमार बिहारी यांच्या म्हणण्यानुसार, आई-वडील सर्व गावात राहतात. गावात कौटुंबिक वाद नव्हते.

Cuttack POCSO Court Judge Subhash Kumar Bihari
Shahaji Patil : 'शहाजीबापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही'

'न्यायाधीश दोन दिवस रजेवर होते'

न्यायाधीशांचे स्टेनो आरएन महापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, सुभाष कुमार दोन दिवसांच्या सुट्टीनंतर शुक्रवारी कामावर परतणार होते. परंतु, त्यांनी शुक्रवारपासून पुन्हा सुट्टीसाठी अर्ज केला. न्यायाधीशांनी मला सकाळी 10:00 वाजता बोलावलं आणि शुक्रवारचा सुट्टीचा अर्ज लिहिण्यास सांगितलं, असं त्यांनी नमूद केलं. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.