Special Parliament Session: सीपीआयच्या खासदारानं व्यक्त केली शंका; म्हणाले, संसदेचं अधिवेशन सुरु झालं पण...

संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.
Parliament Monsoon Session
Parliament Monsoon Session
Updated on

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरु होत आहे. नव्या संसद भवनात हे अधिवेशन पार पडणार आहे. सत्ताधारी एनडीएतील पक्ष आणि इंडिया आघाडीसह इतर विरोधीपक्षांनी या अधिवेशनासाठी व्हिपही काढले आहेत. पण हे अधिवेशन नक्की कशासाठी बोलावलं आहे? याबाबत मीडियासह अद्याप कोणालाही काहीही माहिती नाही. त्यामुळं कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनॉय विश्वम यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. (Special Parliament Session CPI MP Binoy Viswam expresses doubt He said Parliament session has started but)

इतकी गुप्तता का?

अधिवेशनापूर्वी संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलाताना बिनॉय रॉय म्हणाले, आम्हाला हे कळत नाहीए की या सरकारनं अधिवेशनाबाबत इतकी गुप्तता का पाळली आहे. ही गुप्तता अधिवेशन आजपासून सुरु होतंय तोपर्यंत ठेवली गेली आहे. (Latest Marathi News)

पण इतकी गुप्तता का पाळण्यात आली आहे? यावर भाजप काहीतरी षडयंत्र, गुप्तता आणि लोकशाहीविरोधी विचार करत आहे. जर त्यांनी महिला आरक्षण विधेयक आणलं तर निश्चितच आमचा त्यांना पाठिंबा असेल. (Marathi Tajya Batmya)

महिला आरक्षण विधेयक येणार

या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक येणार असल्याची चर्चा आहे. याचे संकेत भाजपच्या खासदार सरोज पांडे यांनी दिले आहेत. त्यांनी म्हटलं, विरोधकांना या अधिवेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कुठलाही अधिकार नाही. संसदेची ही जुनी इमारत ऐतिहासिक आहे, अनेक ऐतिहासिक क्षणांची ती साक्षीदार आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या जुन्या संसद भवनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

या निर्णयांमध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत. महिलांना इथेच मंत्रिमंडळात जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व मिळालं. येत्या काळात देखील महिलांना अनेक गोष्टी मिळतील कारण पंतप्रधान मोदी भारताचं नेतृत्व करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.