नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाचा दुसरा दिवस नव्या संसदेतून सुरु होणार आहे. यापार्श्वभूमीवर जुन्या संसद भवनाला निरोप देतानाचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यावेळी त्यांनी या संसद भावनाच्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा दिला.
तसेच नव्या भवनात आता आपण जात आहोत पण जुनं संसद भवन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिलं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (We are going to the new Parliament building but old building is giving inspiration to new generation says PM Modi)
मोदी म्हणाले, जुन्या संसदेला स्मरण करताना आणि नव्या भवनात जाण्यापूर्वी इतिहासाच्या त्या प्रेरक महत्वपूर्ण क्षणांना स्मरण करुन आपण पुढे जात आहोत. या ऐतिहासिक भवनाला निरोप देत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे भवन इम्पिरिअल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलचं काम करत होतं, स्वातंत्र्यानंतर त्याला संसद भवनाचा दर्जा मिळला.
ही इमारत उभारण्याचा निर्णय विदेशी खासदारांचा होता. पण आम्ही हे कधीही विसरु शकत नाही आणि गर्वानं सांगू शकतो की या संसद भवनात परिश्रम, घाम माझ्या देशवासियांनी गाळला होता. तसेच पैसे देखील माझ्या देशाच्या लोकांचे होते. या ७५ वर्षांच्या आपल्या यात्रेनं अनेक लोकशाही परंपरांची टिकवणूक केली.
आपण नव्या भवनात भलेही जाऊ पण जुनं संसद भवन देखील येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिल. हा भारताच्या लोकशाहीच्या स्वर्णिम प्रवासाचा भाग आहे. भारताच्या रक्तात लोकशाहीचं सामर्थ्य कसं आहे याची आठवण या भवनापासून होत राहिलं. अमृत काळातील पहिली पहाट, राष्ट्राला नवा आत्मविश्वास, नवा प्रण, नवं सामर्थ्यानं भरणार आहे. चारी बाजूंनी आज भारतीयांची चर्चा होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.