Jet Airways Naresh Goyal: कॅन्सरग्रस्त नरेश गोयल यांना कोर्टाचा झटका! नाकारला अंतरिम जामीन

वैद्यकीय कारणासाठी त्यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता.
Naresh Goyal_Jet Airways
Naresh Goyal_Jet Airways
Updated on

नवी दिल्ली : जेट एरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा अंतरिम जामीन विशेष पीएमएलए कोर्टानं फेटाळून लावला आहे. वैद्यकीय कारणासाठी त्यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टानं जामीन फेटाळताना त्यांना न्यायालयीन कोठडीतच उपचार घेण्याचे आदेश दिले आहेत. (special PMLA court has rejected the interim bail plea of Jet Airways founder Naresh Goyal)

कोर्टानं नेमकं काय म्हटलंय?

विशेष पीएमएलए कोर्टानं गोयल यांच्या अर्जावर सुनावणी करताना त्यांनी दिलेल्या वैद्यकीय कारणांनी समाधान झालं नाही. त्यामुळं कोर्टानं उपचारांसाठी अंतरिम अर्थात तात्पुरत्या जामिनाची केलेली मागणी फेटाळली. तसेच गोयल यांनी रुग्णालयात उपचार घ्यावेत पण ते न्यायलयीन कोठडीतच घ्यावे लागतील, असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Naresh Goyal_Jet Airways
Nirmala Sitharaman: "मुंबई सारखं नाही! बेंगळुरूमधील उद्योजक खूप सभ्य अन् शांत" अर्थमंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ

गोयल यांना काय आहे आजार?

गोयल यांनी याचिकेत सांगितल्याप्रमाणं, खाजगी डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमध्ये आपल्याला जीवघेणा कॅन्सरचा आजार आढळून आला आहे. वैद्यकीय नोंदीनुसार, गोयल यांच्या आतड्यात एक लहान ट्यूमर आहे, ज्याला 'न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर' (हळू-वाढणारा कर्करोग) म्हणतात. या गंभीर आजाराबरोबरच, त्यांना सुमारे 35 सेमी ते 40 सेमीचा हर्निया देखील आहे. गोयल यांच्या अर्जात म्हटले आहे की, त्यांची बायोप्सी हिस्टोपॅथॉलॉजिकल विश्लेषण आणि इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीसाठी पाठवण्यात आली होती. या वैद्यकीय चाचण्यांच्या निष्कर्षांच्या आधारे, गोयल यांनी प्रथम कर्करोगासाठी पीईटी स्कॅन करणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारावर डॉक्टर शस्त्रक्रिया, केमोथेरपीसह उपचारांची दिशा ठरवतील.

कोर्टानं वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे दिले आदेश

ईडीने त्यांच्या अंतरिम जामीन याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानं कोर्टानं यापूर्वी गोयल यांच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा प्राथमिक आदेश दिला होता.

Naresh Goyal_Jet Airways
Cattle Ear Tagging: राज्यातील पशुधनांना ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक, का केली जाते इअर टॅगिंग? जाणून घ्या

काय आहे प्रकरण?

नरेश गोयल यांच्यावर कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कॅनरा बँकेने जेट एअरवेजला 848 कोटी 86 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं. या कर्जापैकी 538 कोटी 62 लाख रुपये कंपनीनं अद्याप परत केलेले नाहीत.

याप्रकरणी सीबीआयनं मे 2023 मध्ये नरेश गोयल, पत्नी अनिता गोयल आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 19 जुलै २०२३ रोजी ईडीची यात एन्ट्री झाली, त्यानंतर गोयल यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला. पुढे 1 सप्टेंबर 2023 रोजी नरेश गोयल यांना ईडीनं अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.