Spice Jet : स्पाईसजेटला DGCA ची दिवाळी भेट; निर्बंध उठवले

Spice jet
Spice jet esakal
Updated on

DGCA Lifts Restrictions From SpiceJet : DGCA ने SpiceJet च्या फ्लाइट्सवरील 50 टक्के बंदीचे निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला असून, येत्या 30 ऑक्टोबरपासून स्पाइसजेट 100 % क्षमतेने उड्डाण करू शकणार आहे. DGCA ने जारी केलेल्या हिवाळी वेळापत्रकानुसार SpiceJet ला दर आठवड्याला 3,193 उड्डाणे चालवण्याची परवानगी दिली होती. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच DGCA कडून निर्बंध मागे घेण्यात आल्याने ही कंपनीला दिवाळीला मोठी भेट मिळाली आहे.

21 सप्टेंबर रोजी DGCA) ने ऑपरेटिंग क्षमतेची मर्यादा 29 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. वाढत्या तांत्रिक तक्रारींनंतर स्पाइसजेटवर 50 टक्के क्षमतेने उड्डणा करण्याचे निर्बंध लादण्यात आले होते. सुरुवातीला हे निर्बंध 8 आठवडे लागू करण्यात आले होते. त्यानंतर हे निर्बंध 29 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आले होते.  

हैदराबादमध्ये Q400 विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर डीजीसीएनेही चौकशी सुरू केली होती. 12 ऑक्टोबरला फ्लाइटच्या केबिनमधून धूर निघाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. सध्या स्पाइसजेटकडे 14 Q400 विमाने आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.