दिल्लीहून जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान सकाळी काही वेळाने परत दिल्ली विमानतळावर आले. विमान टेक ऑफ केल्यानंतर 5000 फूट उंचीवर पोहोचले तेव्हा पायलटच्या केबिनमध्ये अचानक धूर निघायला लागला. विमानाच्या केबिनमधून धूर निघत असल्याचे पाहून पायलटने इमर्जन्सी लँडिंग केले. (SpiceJet Aircraft Makes Emergency Landing At Delhi Airport After Crew Notices Smoke In Cabin)
एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये विमानात धूर दिसत आहे. धुरामुळे आत बसलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. यानंतर विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. विमानातून प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जबलपूरला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.