स्पाइसजेटच्या विमानातील गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीय.
नवी दिल्ली : स्पाइसजेटच्या विमानातील (Spicejet Aircraft) गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीय. आज (गुरुवार) दिल्लीहून एक विमान नाशिकला (Nashik) जात असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ते विमान तातडीनं दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) उतरवण्यात आलं.
स्पाइसजेटनं दिलेल्या माहितीनुसार, विमान आणि त्यातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना पाठवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, स्पाइसजेटचं बी 737 विमान गुरुवारी सकाळी दिल्लीहून नाशिकला जात होतं. विमान हवेत असताना त्याच्या ऑटो पायलटला समस्या आली. यानंतर वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली.
त्यानंतर वैमानिकाला दिल्ली विमानतळावर परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या स्पाइसजेटचं बोईंग 737 विमान सुरक्षितपणे उतरलं आहे. तसेच डीजीसीएनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.