विमानात लग्न करण्याची हौस भोवणार; DGCAचे कारवाईचे आदेश

SpiceJet Crew
SpiceJet Crew
Updated on
Summary

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध आले आहे.

नवी दिल्ली- कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध आले आहे. लोकांना लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग काढताना दिसत आहेत. असाच प्रकार तमिळनाडूच्या मदुरैमध्ये समोर आला होता. मदुरैच्या राकेश आणि दीक्षाने विमानामध्ये लग्न केले होते. असे असले तरी याप्रकरणी डीजीसीए (DGCA) कारवाई करण्याची शक्यता आहे. (SpiceJet Crew Derostered After Viral Video Of MidAir Wedding)

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तमिळनाडू सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. असे असताना मदुरै येथील गौरपीलयम येथे राहणाऱ्या एका लाकूड व्यावसायिकाचा मुलगा राकेश याचं लग्न एका उद्योगपतीच्या मुलीशी विमानात लावण्यात आले. लग्नसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी दोन्ही कुटुंबाने एका खासगी विमान कंपनीकडे विमान बुक केलं होतं. हे विमान केवळ नातेवाईकांसाठीच बुक करण्यात आलं होतं.

SpiceJet Crew
मानसिक शांतीसाठी गाईला 'जादूची झप्पी'; मोजताहेत 15,000 रुपये

विशेष म्हणजे जिथे लग्नसोहळ्याला केवळ ५० माणसांची परवानगी आहे तेथे चक्क १६१ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रिपोर्टनुसार फ्लाईटने मदुरैमधून उड्डान केले. विमान दोन तास हवेत होतं, याकाळात जोडप्याचे लग्न झाले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये वऱ्हाडी विनामास्क दिसत आहेत. शिवाय शारीरिक अंतराचे पालन करण्याच्या नियमाचा फड्डा उडाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. खासगी विमान कंपनीने दावा केलाय की, सर्वांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना फ्लाईमध्ये बसवण्यात आलं होतं.

SpiceJet Crew
लग्न पहावं करुन! चक्क उडत्या विमानात त्यांनी बांधली लग्नगाठ

डीजीसीएने तक्रार नोंदवण्याचे दिले निर्दश

एअरपोर्ट डायरेक्टरने म्हटलंय की, मदुरैतून एक स्पाईसजेट चार्टर्ड विमान बुक होते, एअरपोर्ट ऍथोरिटीचे अधिकारी यांना या लग्न समारंभाविषयी काहीही माहिती नव्हती. दुसरीकडे, डीजीसीएने म्हटलंय की, याप्रकरणाचा तपास सुरु आहे आणि एअरलाईन आणि एअरपोर्ट ऍथोरिटीकडून रिपोर्ट मागण्यात आली आहे. एअरलाईने संबंधित अधिकाऱ्यांसह कोविड-19 नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()