पाटणा : बिहारची राजधानी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात (SpiceJet flight) आग लागली. विमानात अनेक प्रवासी होते. पाटणा (Patna) विमानतळावर विमानाचे पुन्हा सुरक्षित लँडिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (SpiceJet flight from Patna to Delhi caught fire; Safe landing)
विमानाच्या इंजिनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर आले. विमान उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे. विमानाने उड्डाण करताच एका इंजिनमधून धूर निघताना दिसला. यानंतर विमानाने विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही, असे पाटणाच्या (Patna) एसएएसपीने मीडियाला सांगितले.
विमानतळाबाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय उपचार करता येतील. विमानातील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळावर अग्निशमन दलाच्या अतिरिक्त गाड्याही मागवण्यात आल्या आहेत.
पाटणा-दिल्ली विमानाने विमानतळावरून उड्डाण करताच डाव्या बाजूला असलेल्या इंजिनला आग (caught fire) लागली. फुलवारी शरीफ परिसरातील लोकांनी उडत्या विमानातून धूर निघताना बघितला. त्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाला फोन करून माहिती दिली.
प्रशासनाने तातडीने कारवाई करीत विमानतळ प्रशासनाला कळवले. त्यानंतर विमान (flight) परत पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. स्थानिक लोकांनी उडत्या विमानात आग लागल्याचा व्हिडिओही घेतला, असे पाटणा डीएम चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.