‘स्पुटनिक व्ही’चे भारतात उत्पादन झाले सुरू

भारतीय कंपनी पॅनाशिया बायोटेकने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन सुरू केले आहे.
Sputnik v
Sputnik vSakal
Updated on

बद्दी (हिमाचल प्रदेश) - भारतीय कंपनी पॅनाशिया बायोटेकने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnic V) लसीचे (Vaccine) उत्पादन (Production) सुरू केले आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडच्या (आरडीएफआय) (RDFI) मदतीने हे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. (Sputnik V Begins Production in India)

‘आरडीआयएफ’ आणि पॅनाशिया बायोटेकने या लस निर्मितीसाठी करार केला होता. त्या करारानुसार लस निर्मिती सुरू झाली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ चे वर्षाला दहा कोटी डोस पॅनाशिया कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येईल.पॅनाशिया बायोटेक कंपनीने हिमाचल प्रदेशातील बद्दी येथील कारखान्यात ‘स्पुटनिक व्ही’ लसीची निर्मिती सुरू केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लशींची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता पारखली जाणार आहे.

Sputnik v
पूर्वनोंदणीशिवाय लस, वशिलेबाजांचं फावणार का?

“पॅनासिया बायोटेकसोबत आम्ही भारतात उत्पादन सुरु केले आहे. यामुळे देशातील करोना स्थितीशी लढण्यात मदत होणार आहे. भारतात लशींची पूर्तता झाल्यानंतर इतर देशांमध्ये त्याची निर्यात केली जाणार आहे,” असे आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रिव यांनी म्हटले आहे. ‘‘स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती भारतात सुरु झाल्याने त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास जनजीवन सुरळीत होण्यास मदत होईल,’’ असे पॅनाशिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी म्हटले आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींनंतर रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारताने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. रशियातून या लसीचे डोस भारतात आल्यानंतर १४ मेपासून या लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.