कोलंबो : श्रीलंकेत सध्या मोठ्या गोंधळ सुरू असून आंदोलकांनी नुकतंच राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे राष्ट्रपती गाटाबाये राजपक्षे यांनी पळ काढवा लागला होता. अशा परिस्थितीत श्रीलंकेतील बिघडलेली परिस्थिती हाताळण्यासाठी आणि राजपक्षे सरकारला मदत करण्यासाठी भारतीय सैन्य पाठवण्याच्या भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विधानावरून श्रीलंकेतील नागरिक संतापले आहेत. श्रीलंकेतून संताप व्यक्त झाल्यानंतर भारतीय दूतावासाने स्वामी यांच्या भूमिकेशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. (SriLanka crisis news in marathi)
राजपक्षे कुटुंबाचे निकटवर्तीय समजले जाणारे स्वामी यांनी म्हटलं होतं की, गोटाबाया आणि महिंदा राजपक्षे यांनी निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत संतप्त जमावाला निवडून दिलेले सरकार पाडण्यास भारत परवानगी कशी काय देऊ शकते ? असा प्रश्नही स्वामी यांनी उपस्थित केला.
स्वामींच्या या वक्तव्यावर श्रीलंकेतील सोशल मीडियावरील वातावरण चांगलच तापल आहे. याला पूर्णविराम देण्यासाठी श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने एक निवेदन जारी करून स्वामींच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं की, 'श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठवण्याचे मीडिया आणि सोशल मीडियावरील वृत्त निराधार आहे. व्यक्त करण्यात आलेलं मत भारत सरकारच्या भूमिकेनुसार नाही, असं दुतावासाने म्हटलं आहे. तसेच भारत श्रीलंकेच्या लोकांसोबत आहे, ज्यांना समृद्धीसाठी लोकशाही मार्गाने प्रगती हवी आहे, असंही भारतीय दूतावासाने म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.