श्रीलंकेत 21 भारतीय मच्छिमारांना अटक; नौदलाकडून दोन नौका जप्त

Indian Fishermen
Indian Fishermenesakal
Updated on
Summary

श्रीलंकेच्या न्यायालयानं गेल्या आठवड्यातच 56 भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचे आदेश दिले होते.

श्रीलंकेच्या नौदलानं (Sri Lanka) आज (मंगळवार) स्थानिक मच्छिमारांच्या सतर्कतेनंतर, देशातील प्रादेशिक पाण्यात अवैधरित्या मासेमारी केल्याप्रकरणी 21 भारतीय मच्छिमारांना (Indian Fishermen) अटक केलीय. यासोबतच मासेमारी करणाऱ्या दोन नौकाही जप्त केल्या आहेत. उत्तरेकडील भारतीयांना मासेमारीकरिता श्रीलंकेच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक मच्छिमार एक आठवड्याहून अधिक काळ विरोध करत असताना ही घटना घडलीय.

Indian Fishermen
झालेल्या चुका मान्य करून पुढे जा; एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना सल्ला

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील श्रीलंकेच्या भागात पॉइंट पेड्रोच्या किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमारांना दोन भारतीय नौका दिसल्या. नौदलाचे (Sri Lanka Navy) प्रवक्ते कॅप्टन इंडिका सिल्वा (Indica Silva) यांनी सांगितलं की, भारतीय मच्छिमार आणि दोन बोटींना पुढील कारवाईसाठी मासेमारी निरीक्षक कार्यालयानं कानकेसंतुराई येथील पोलिस कोठडीत रवानगी केलीय. स्थानिक मच्छिमारांनी दावा केलाय की, त्यांचे दोन सहकारी उत्तर समुद्रात बेपत्ता झाले आहेत आणि त्यांना भारतीय मच्छिमारांकडून नुकसान झाल्याची भीती आहे.

Indian Fishermen
50 हजारांहून अधिक साप पकडणाऱ्या सुरेशला नागाचा दंश

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, जाफनामधील मर्दानकेनी बीचवर दोन श्रीलंकन ​​मच्छिमारांचे (Indian Fishermen in Sri Lanka) मृतदेह सापडले आहेत. हे लोक जाफना जिल्ह्यातील वडामराचीच्या समुद्र किनाऱ्यावर गेले होते. श्रीलंकेच्या न्यायालयानं गेल्या आठवड्यातच 56 भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचे आदेश दिले होते. श्रीलंकेच्या पाण्यात मासेमारी केल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, श्रीलंकेची आर्थिक स्थिती (Sri Lanka Economic Situation) बिकट असल्यानं भारत त्यांना आर्थिक मदत करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.