श्रीलंकन नौदलाची कारवाई; 55 भारतीय मासेमारांना केली अटक

श्रीलंकेच्या नौदलाची भारतीय मासेमारांविरुद्ध कारवाई; 55 जणांना केली अटक
Sri Lankan Navy
Sri Lankan Navyesakal
Updated on

कोलंबो : श्रीलंकेच्या नौदलाने (Sri Lankan Navy) 19 डिसेंबरला भारतीय मासेमारांच्या (Indian Fishermen) आठ वेसल ताब्यात घेतल्या आणि 55 मासेमारांना अनधिकृत शिकारीप्रकरणी अटक केली. श्रीलंका सरकारने सांगितले की, उत्तरी नौदल कमांडच्या अख्त्यारित येणाऱ्या शीघ्र कृती दलाच्या नौकांनी सहा मासेमारीच्या नौका (Fishing Trawlers) ताब्यात घेतल्या आहेत आणि 43 मासेमारांना अटकही केली आहे. या मासेमारीच्या नौका तामिळ नाडूच्या रामेश्वरम येथून आल्या होत्या. त्या नेडुनथीवू (Neduntheevu)या जाफना (Jaffna) येथील बंदराकडे येत होत्या. ही कारवाई कोरोनाचे (Corona) सर्व प्रोटोकॉल पाळून करण्यात आली. पकडलेल्या मासेमारांना रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्यानंतर संबधित अधिकाऱ्यांकडे त्यांचे हस्तांतरण करण्यात येईल.

Sri Lankan Navy
ओमिक्राॅनकडे दुर्लक्ष नको! ब्रिटनमध्ये एका दिवसात १० हजार नवे रुग्ण

भारतीय मासेमारांवर (Indian Fishermen) केलेल्या कारवाईनंतर संबंधित संस्थेने सांगितले की श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी श्रीलंकेचे नौदल (Sri Lankan Navy) कायम गस्त घालत असते. 19 डिसेंबरलाच नौदलाने मंडपम येथून दोन मासेमारी करणाऱ्या नौका जप्त केल्या आणि 12 मासेमारांना अटक केली आहे. त्यांना श्रीलंका नौदलाच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना अटक केली आहे की त्यांना ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही माहिती चेन्नईच्या मासेमारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Sri Lankan Navy
अफगाण जनतेला मदत आवश्‍यक; भारत-मध्य आशिया चर्चेत सूर

ज्यावेळी श्रीलंकेत या मासेमारांना अटक केल्याचे वृत्त तामिळनाडूच्या (Tamil Nadu) किनारी भागात पसरले त्यावेळी मासेमारांच्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मासेमारांचे नेते जेसू राजा यांनी द हिंदूला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले 'केंद्र आणि राज्य सरकारने त्वरित या गोष्टीत लक्ष घालावे आणि मासेमारांच्या सुरक्षेबाबत, त्यांना त्यांच्या नौकांसह परत आणण्याबाबत पावले उचलावीत. तोपर्यंत मासेमार समुद्रात जाणार नाहीत.' जेसू राजा यांनी भारत सरकारवर मासेमारी करणाऱ्या समुदायाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.

जेसू राजा म्हणाले की, 'मासेमारांनी श्रीलंकेच्या सागरी सीमांमध्ये प्रवेश केलेला नाही. श्रीलंकन नौदलाने भारतीय मासेमारांवर श्रीलंकेची सागरी सीमा ओलांडण्याचा आरोप करुन त्यांना बळजबरीने अटक करणे नेहमीचेच झाले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.