भारत हा भाज्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा जगातला दुसरा देश आहे. पण भारतातल्या एकूण उत्पादनापैकी केवळ ३० ते ४० टक्के माल ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच फळं – भाजीपाला खराब होतो. योग्य स्टोरेज आणि साधनांच्या अभावाने शेतकऱ्यांना उत्पादन योग्य वेळी न विकता आल्याने एकतर फळं,भाजीपाला फेकावा लागतो किंवा कमी खर्चांत विकावा लागतो.
ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही हा तोटा सोसावा लागतो. पण देशातल्या या गंभीर समस्येवर उपाय शोधून काढण्यात आला आहे. आपलं उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असते. पण कोल्ड स्टोरेज महागडं असतं. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी चांगल्या आणि किफायतशीर कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे.
चेन्नईच्या दीपक राजमोहन या व्यक्तीने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. ऍग्रीकल्चर आणि फूड सायन्स इंजिनियर असलेला दीपक अमेरिकेमध्ये नोकरी करत होता. २०१९ मध्ये त्याने भारतात येऊन फूड वेस्टच्या समस्येवर काम करण्यास सुरुवात केली. त्याने चेन्नईमध्ये आपल्या लॅबमध्ये प्लांट बेस्ड टेक्नॉलॉजी वापरून एक प्राकृतिक पावडर तयार केला आहे.
या नैसर्गिक पावडरच्या पॅकेट्सला फळ-भाजीपाल्यात ठेवल्याने त्या फ्रीजशिवायही ताजे राहू शकतात. दीपकने अनेक शेतकऱ्यांच्या भाज्यांवर या नैसर्गिक तंत्राचा वापर केला आणि या भाज्यांची शेल्फ लाईफ जवळपास १२ दिवसांपर्यंत वाढल्याचं त्याच्या लक्षात आलं. दीपकने आपल्या या संशोधनाला एका प्रोडक्टच्या रुपात समोर आणलं आहे. त्याने आपला लहानपणीचा मित्र विजय आनंद याच्यासोबत एका स्टार्टअपची सुरुवात केली आहे.
त्यांच्या या पॅकेटची किंमत भाज्या आणि फळांसाठी वेगवेगळी आहे. तसंच या पॅकेटचा आकारही वेगवेगळा आहे. उदाहरणार्थ एक किलो आंब्यामध्ये ५ रुपयांचं पॅकेट ठेवू शकतो. तर एक किलो ढोबळी मिरचीसाठी ४ रुपयाचं पॅकेट वापरता येईल. एक किलो टोमॅटोसाठी १.२५ रुपयांचं पॅकेट वापरता येईल.
दीपक आपलं स्टार्टअप ग्रीनपॉड लॅब्सच्या माध्यमातून जवळपास १५ जणांना रोजगार देत आहेत. आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून हे प्रोडक्ट सध्या विकलं जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.