Congress : वादग्रस्त वक्तव्य भोवलं! 'या' बड्या नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी, रेड्डींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

Congress general secretary Kavita Reddy : अलीकडेच राज्यात काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदासाठी (Congress Woman President) मोठी स्पर्धा होती.
State Congress general secretary Kavita Reddy
State Congress general secretary Kavita Reddyesakal
Updated on
Summary

वादग्रस्त विधाने आणि लिखाण केल्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, अशी नोटीसही बजावण्यात आली होती.

बंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षपदी सौम्या रेड्डी (Sowmya Reddy) यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याप्रकरणी प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस कविता रेड्डी (Kavita Reddy) यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. केपीसीसी शिस्तपालन समितीचे अध्यक्ष के. रहमान खान यांनी हा आदेश जारी केला.

अलीकडेच राज्यात काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदासाठी (Congress Woman President) मोठी स्पर्धा होती. मात्र, बंगळूरमधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदार सौम्या रेड्डी यांना केपीसीसीच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. केवळ मंत्र्यांची मुलगी आहे म्हणून लॉबिंग करण्यात आले. पक्ष संघटनेसाठी काम करणाऱ्यांची उपेक्षा झाल्याचे मत तिने व्यक्त केले.

State Congress general secretary Kavita Reddy
'शक्तिपीठ' मार्गाला पुन्हा 'शक्ती? शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याची सरकारची तयारी; राजू शेट्टींना रस्ते महामंडळाचे पत्र

तसेच सौम्या रेड्डी यांची महिला अध्यक्षपदी निवड करण्यास विरोध केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांना त्यांनी पत्रही लिहिले. यानंतर त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. कविता रेड्डी यांना पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल यापूर्वी नोटीसही देण्यात आली होती आणि भविष्यात असे कोणतेही वक्तव्य करू नये, अशी तोंडी सूचनाही दिली होती.

State Congress general secretary Kavita Reddy
सिद्धेश्वर साखर कारखान्याची 'ती' मागणी फेटाळली; विमानतळाच्या जागेचा वाद पुन्हा उफाळणार, काय आहे प्रकरण?

मात्र, वादग्रस्त विधाने आणि लिखाण केल्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, अशी नोटीसही बजावण्यात आली होती. पक्षाच्या शिस्तपालन समितीला सात दिवसांत योग्य तो खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने कविता रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()