आता अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; आरोग्य विभाग महत्त्वाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत!

तामिळनाडू राज्यात अवयवदान करणाऱ्यांवर असे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात.
Organ Donation Campaign
Organ Donation Campaignesakal
Updated on
Summary

बेळगावात केएलई हॉस्पिटलच्या माध्यमातून अवयवदान मोहीम राबविली जात आहे.

बेळगाव : देहदान व अवयवदान मोहिमेला (Organ Donation Campaign) नागरिकांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी राज्यशासनाकडून नवे धोरण तयार केले जाणार आहे. अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा प्रस्ताव लवकरच आरोग्य विभागाकडून (Health Department) तयार केला जाणार आहे.

तामिळनाडू राज्यात अवयवदान करणाऱ्यांवर असे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. असा निर्णय घेणारे ते देशातील एकमेव राज्य आहे. त्याच धर्तीवर कर्नाटकातही ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक तामिळनाडू येथे पाठविले जाणार आहे.

Organ Donation Campaign
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ; सरकार कोसळण्याची शक्यता, उलट-सुलट चर्चांना उधाण

ही योजना राबविण्यासाठी राज्यशासनाच्या अन्य शासकीय विभागांचीही मदत लागणार आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला विलंब लागणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव व आरोग्य तसेच कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त रणदीप डी. यांनी याबाबत सूतोवाच केले आहे. कर्नाटकात देहदान किंवा अवयवदान करणाऱ्यांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे.

राज्यात काही संस्‍थांनी यासाठी विशेष चळवळ सुरू केली आहे. ती चळवळ रुजावी व वाढावी, यासाठी आरोग्य विभागाकडूनही प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून आरोग्य विभागाकडून या अभिनव योजनेचा विचार सुरू आहे. मंगळूर येथे बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय प्रमाणपत्र देण्याबाबतची नवी माहिती दिली आहे. अवयवदान करणाऱ्यांना सध्या शासनाकडून कोणतेही प्रमाणपत्र दिले जात नाही; पण भविष्यात असे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Organ Donation Campaign
Karnataka Government : 'कावेरी'चा कर्नाटकाला पुन्हा धक्का; तमिळनाडूला पाणी सोडण्याचे सरकारला दिले आदेश

राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अवयवदान केल्याच्या मोबदल्यात कुटुंबीयांना कोणताही आर्थिक मोबदला मिळत नाही. किमान शासनाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा, असा आरोग्य खात्याचा विचार असल्याचे महापालिका फोटो गुंडूराव यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रमाणपत्र वितरण व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार या दोन्ही योजना भविष्यात आरोग्य विभागाकडून राबविल्या जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातचा निर्णय घेण्याआधी पोलिस व संबंधित अन्य शासकीय खात्यांसोबत चर्चा करणे आवश्‍यक आहे.

Organ Donation Campaign
Diwali Festival : दिवाळीत फक्त हिरवे फटाकेच फोडण्यास परवानगी; सरकारकडून सक्त सूचना, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू

त्यामुळेच या निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बेळगावात केएलई हॉस्पिटलच्या माध्यमातून अवयवदान मोहीम राबविली जात आहे. गेल्या महिन्यात केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अवयवदान केलेल्यांच्या अंत्यसंस्कारावेळी शासकीय मानवंदना देण्याबाबतचा विषय चर्चेला आला होता. यासंदर्भातची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती त्यावेळी डॉ. कोरे यांनी दिली होती. राज्यभरातून अशी मागणी शासनाकडे झाली, तर याबाबत लवकर निर्णय होऊ शकतो. त्यानंतर अवयवदानाला प्रतिसाद वाढण्याची शक्यताही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()