S. Jaishankar : संघर्षाच्या काळात गांधीजींचा संदेश महत्त्वाचा;जयशंकर यांचे प्रतिपादन,टोकियोमध्ये पुतळ्याचे अनावरण

जगामध्ये अनेक ठिकाणी संघर्ष सुरू असताना, ध्रुवीकरण आणि रक्तपात सुरू असताना महात्मा गांधी यांचा शांतता आणि अहिंसेचा संदेश सर्वाधिक संयुक्तिक आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केले.
S. Jaishankar
S. Jaishankar sakal
Updated on

टोकियो : जगामध्ये अनेक ठिकाणी संघर्ष सुरू असताना, ध्रुवीकरण आणि रक्तपात सुरू असताना महात्मा गांधी यांचा शांतता आणि अहिंसेचा संदेश सर्वाधिक संयुक्तिक आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केले. जपान दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी आज टोकियो येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले, त्यावेळी ते बोलत होते.

लाओस दौरा आटोपून जयशंकर हे आज जपानमध्ये दाखल झाले. क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. टोकियोमधील एदोगावा भागात फ्रिडम प्लाझा येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ते म्हणाले,‘‘जगभरात सध्या सर्वत्र संघर्षाचे वातावरण आहे. सर्वत्र तणाव आहे, ध्रुवीकरण आणि रक्तपात आहे. कोणत्याही प्रश्‍नावर युद्धभूमीवरून तोडगा निघत नाही, कोणताही काळ हा युद्धाचा काळ असू शकत नाही, हा गांधीजींचा संदेश या पार्श्वभूमीवर मोलाचा ठरतो. ऐंशी वर्षांपूर्वी हा संदेश जितक्या प्रमाणात लागू ठरत होता, तितक्याच प्रमाणात आजही लागू होतो. गांधीजी हे शाश्‍वत विकासाचे खरे उद्घाते होते. निसर्गाशी सहजीवन कसे असावे, याचे ते सर्वांत मोठे पुरस्कर्ते होते. गांधीजींचे जीवन आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा शांतता आणि अहिंसेचा संदेश कालातीत आहे. सध्याच्या काळात तर या संदेशाची अंमलबजावणी अत्यावश्‍यक आहे.’’

गांधीजींच्या संदेशांची अंमलबजावणी करणे हे केवळ सरकारचे काम नाही, ती लोकांची जबाबदारी आहे. गांधीजींना सर्वसमावेशकता अपेक्षित होती. भारत सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे.

- जयशंकर, परराष्ट्र मंत्री

रामलल्लाचे पहिले टपाल तिकीट

लाओस दौऱ्यादरम्यान जयशंकर यांच्या हस्ते अयोध्येतील रामलल्लाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले. रामलल्लाचे छायाचित्र असलेले हे पहिलेच टपाल तिकीट आहे. याशिवाय, लाओसची प्राचीन राजधानी असलेल्या लुआंग प्रबांग येथील भगवान बुद्धांच्या मूर्तीचे छायाचित्र असलेल्याही टपाल तिकीटाचेही अनावरण यावेळी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.