'मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवा, कोणताही धर्म कायद्यापेक्षा मोठा नाही'

Janak Ram
Janak Ramesakal
Updated on
Summary

होळी, दीपावली, छठ आणि हिंदूंच्या इतर सणांवर लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी आहे.

बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा लाऊडस्पीकरचा (Loudspeaker) वाद चव्हाट्यावर आला असून, भाजपच्या कोट्यातील मंत्री जनक राम (Janak Ram) यांनी कायद्यापेक्षा कोणताही धर्म मोठा नसल्याचं म्हटलंय. मंदिर (Temple) आणि मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत ते म्हणाले, देश आणि राज्य कायद्यानं चालतं. हा कायदा यूपीमध्ये लागू झाला तर बिहारमध्येही त्याचा परिणाम होईल. या प्रकरणावर केंद्रातील नेते, राज्यातील नेते मुख्यमंत्र्यांशी एकत्र चर्चा करुन निर्णय घेतील. कारण, ध्वनिप्रदूषण टाळण्याचा हाच मार्ग आपल्याकडं असल्याचं त्यांनी सांगितलं.

याआधी केंद्रीय मंत्री जनक राम यांनी मशिदींमधील लाऊडस्पीकरवरील अजानवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वाजवल्यानं सर्वसामान्यांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो, असं त्यांचं म्हणणं होतं.

Janak Ram
लेफ्टनंट जनरल बीएस राजू बनले लष्कराचे नवे उपप्रमुख

कायदा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळं त्याचं पालन सर्वांनीच करावं. मशिदींमध्ये रोज वाजणाऱ्या लाऊडस्पीकरवर बंदी घालायला हवी. होळी, दीपावली, छठ आणि हिंदूंच्या इतर सणांवर लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी आहे. पण, मशिदीत लाऊडस्पीकर वाजवले जाताहेत. हेही थांबवायला हवं. याबाबत लोक सतत त्यांच्याकडं तक्रारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.