Indira Gandhi : इंदिरा गांधींचा पुतळा हटवून बसवली देवीची मूर्ती, काँग्रेस कार्यकर्त्यांत संतापाची लाट

समाजकंटकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुतळ्याची मोडतोड करुन पुतळा फेकून दिला आहे.
Former Prime Minister Indira Gandhi Statue
Former Prime Minister Indira Gandhi Statueesakal
Updated on
Summary

समाजकंटकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुतळ्याची मोडतोड करुन पुतळा फेकून दिला आहे.

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Rajasthan Udaipur) समाजकंटकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या पुतळ्याची मोडतोड करुन पुतळा फेकून दिला आणि त्या जागी दुर्गा मातेची मूर्ती बसवलीय. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

समाजकंटकांनी उद्ध्वस्त केलेला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा हा पुतळा अनेक वर्षांपासून इथं बसवण्यात आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दुर्गा मातेची मूर्ती तेथून हटवली आणि उद्यान सील केलं. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाहीय.

Former Prime Minister Indira Gandhi Statue
Congress MLA : राहुल गांधींना 'जोकर' म्हणणाऱ्या काँग्रेस आमदाराचं निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उदयपूरच्या मावळी तहसीलमधील घासा पोलीस स्टेशन (Ghasa Police Station) हद्दीतील राख्यावाल गावात घडली. 1985 मध्ये हनुमान प्रसाद प्रभाकर यांनी येथील संजय उद्यानात इंदिरा गांधींचा पुतळा बसवला होता. त्यानंतर दरवर्षी इंदिरा गांधी एकता मेळावाही संजय उद्यानात आयोजित केला जातो. शुक्रवारी रात्री अज्ञातांनी पुतळ्याची मोडतोड करून पुतळा फेकून दिला आणि त्याखाली असलेली शीला पाटीही पुसण्याचा प्रयत्न केला. समाजकंटकांनी इंदिरा गांधींचा पुतळा हटवून त्या जागी दुर्गा मातेचा पुतळा बसवला. तिथं स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीचं नवरात्रीच्या काळात नुकतंच विसर्जन करण्यात आलं आहे.

Former Prime Minister Indira Gandhi Statue
काँग्रेस अध्यक्ष झालो तर तरुणांना 50 टक्के पदं देणार; मल्लिकार्जुन खर्गेंची मोठी घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.