Indian Parliament : गांधी, आंबेडकरांचे पुतळे संसद परिसरातून हलविले

संसद परिसरातील दर्शनी भागात असलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अचानकपणे हटविण्यात आले आहेत.
Indian Parliament
Indian Parliamentsakal
Updated on

नवी दिल्ली : संसद परिसरातील दर्शनी भागात असलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अचानकपणे हटविण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या कृतीवर काँग्रेसने जोरदार टीका केली असून ही कृती निंदनीय व क्रूर असल्याचा आरोप केला आहे.

जुन्या व नव्या संसदेच्या इमारतीच्यामध्ये दर्शनी भागातच राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा याच परिसरात राज्यघटनेची प्रत हातात घेतलेला पूर्णाकृती पुतळा आहे.

Indian Parliament
Loksabha Election Result : मोदी व राहुलही मतदारांना नापसंत !

महात्मा गांधी यांचा पुतळा संसद इमारतीच्या जवळ असल्याने विरोधकांतर्फे अनेकदा या पुतळ्याजवळ आंदोलने केली जातात. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरू होते. परंतु पुतळे हलविण्याचे धाडस केले जाईल, याची शक्यता नव्हती. परंतु आता हे पुतळे हलविले जाणार असल्याचा आरोप काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख व खासदार जयराम रमेश यांनी केला आहे. दरम्यान, संसद सुशोभिकरण्याचा पार्श्‍वभूमीवर हे पुतळे संसद परिसरातच अन्यत्र हलविण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.