थंड डोक्याने खून करणारा तो आठ वर्षांचा सीरियल किलर आता कुठे आहे? जगाला हादरवून सोडणारी कहाणी

Story of Amarjeet Sada how 8-year-old boy from Bihar also became worlds youngest serial killer
Story of Amarjeet Sada how 8-year-old boy from Bihar also became worlds youngest serial killer
Updated on

पुस्तकं तसेच चित्रपटांमध्ये सीरियल किलर्सच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण तुम्हाला जगातील सर्वात कमी वयाच्या सीरीयल किलरबद्दल माहिती आहे का? ज्या वयात मुलांना खेळण्यातून वेळ मिळत नाही, त्या वयात लागोपाठ हत्या करत सुटलेल्या या आठ वर्षांच्या मुलाची गोष्ट ऐकून तुमच्या हृदयाचा थरकाप उडेल.

ही घटना आहे बिहार मधील मुसहर गावातील अमरजीत सदा या मुलाची. याला जगातील सर्वात कमी वयाचा सीरियल किलर आणि बिहारमध्ये 'मिनी सीरियल किलर' म्हणून देखील ओळखलं जातं. मुसहर गावात १९९८ साली अमरजीत सदाने खूप कमी वयात आपल्याच सहा वर्षांच्या बहिणीसह तीन लोकांची हत्या केली होती. तसेच असंही सांगितलं जातं की, अमरजीत सदा याने कथितरित्या पहिली हत्या केली तेव्हा त्याचं वय फक्त सात वर्ष इतकं होतं.

सदा हा सीरीयल किलर कसा बनला? याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र सांगितलं जातं की, त्याचा जन्म हा एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडिल हे मजूर होते. २००६ मध्ये अमरजीत सदाने पहिल्यांदा आपल्याच चुलत बहिणीची हत्या केली. इतकेच नाही तर स्वतःच्या अवघ्या आठ महिने वय असलेल्या बहिणीची देखील त्याने हत्या केली.

Story of Amarjeet Sada how 8-year-old boy from Bihar also became worlds youngest serial killer
Mukesh Ambani : नातवंडांचे लाड पुरवायला अंबानींनी विकत घेतली थेट चॉकलेट कंपनी! जिओ, MI नंतर मोठी बिझनेस डिल

जगातील सर्वात कमी वय असणारा सीरियल किलर अमरजीतने त्यानंतर शेजारीच राहाणाऱ्या एका महिलेच्या सहा महिने वयाच्या मुलीची देखील हत्या केली. हा त्याने केलेला तीसरा आणि शेवटचा खून ठरला. ही चिमुरडी तिच्या घरात एकटीच होती, तेव्हा सदाने तिची हत्या केली. ही महिला जेव्हा बाहेरून घरी परत आली तेव्हा तिची मुलगी गायब झाली होती. यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. पोलीस गावात पोहचले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. यानंतर अमरजीत सदा याला देखील प्रश्न विचारण्यात आले.

अगदी काही वेळातच अमतजीतने मान्य केलं की तो शेजारी राहाणाऱ्या या मुलीला घेऊन गेला होता. त्याने पहिल्यांदा तिला विटेने मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. अमरजीत सदा हा नंतर पोलीस आणि गावकऱ्यांना त्या जागेवर देखील घेऊन गेला जेथे त्याने या मुलीचा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला होता.

Story of Amarjeet Sada how 8-year-old boy from Bihar also became worlds youngest serial killer
New Parliament Building : आता PM मोदी आणणार ७५ रुपयांचं नाणं! वापरली जाणार ५० टक्के चांदी

घरच्यांना हत्येबद्दल माहिती होती..

सदाच्या चुलत्यांनी सांगितलं की, पहिल्या दोन हत्यांबद्दल कुटुंबातील काही लोकांना आधीच माहिती होती. मात्र या हत्या कुटुंबातीलच असल्याने त्यांनी पोलीसांना याबद्दल माहिती दिली नाही. पोलीसांनी जेव्हा अमरजीत सदा याला ताब्यात घेतलं, तेव्हा देखील तो हसत होता. काही महिन्यापूर्वी आपल्या सख्या आणि चुलत बहिणीच्या हत्येबद्दल त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता.

एकाच पध्दतीने केल्या हत्या

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सर्व हत्या एकाच पद्धतीने केल्या होत्या. ज्या वयाच अमरजीत सदाने हत्या केल्या, त्यावर काही मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सदाला दुसऱ्यांना वेदना दिल्याने, तसेच इतरांना जखमा केल्याने आनंद मिळत असे. तसेच काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की. त्याला चुक-बरोबरक यात फरक कळत नव्हता, त्यासाठी त्याचं वय खूपच कमी होतं.

Story of Amarjeet Sada how 8-year-old boy from Bihar also became worlds youngest serial killer
Video : मॅच जिंकल्याच्या आनंदात लेकीची धोनीला मिठी! शेलारांशी देखील केला शेकहँड

भारतीय कायद्यानुसार एखाद्या लहान मुलास कैदेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देता येत नाही. त्यामुळे सदाला वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत बिहारच्या मुंगेर शहरातील एका बालगृहात ठेवण्यात आलं होतं असं सांगितलं जातं. असंही सांगितलं जातं की, २०१६ मध्ये अमरजीत सदा याला सोडून देण्यात आलं होतं. मात्र आता सध्या अमरजीत सदा कुठे राहतो याबद्दल कोणालाच माहिती नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()