Stray Dogs Killed Child : धक्कादायक! वडिलांसोबत झोपडीत झोपलेल्या एक वर्षाच्या बाळावर कुत्र्याचा हल्ला, ओढत नेलं अन्...

Stray Dogs Killed Child : या दरम्यान तेलंगाणामधील हैदराबाद शहरात झोपडीत वडिलांसोबत झोपलेल्या एक वर्षाच्या बाळाला भटक्या कुत्र्यांनी ओढून नेत ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Stray Dogs Killed Child
Stray Dogs Killed Child
Updated on

भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. देशातील अनेक शहरात ही समस्या पाहायला मिळते. या दरम्यान तेलंगाणामधील हैदराबाद शहरात झोपडीत वडिलांसोबत झोपलेल्या एक वर्षाच्या बाळाला भटक्या कुत्र्यांनी ओढून नेत ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्थानिकांनी भटक्या कुत्र्यांची टोळी लहान मुलाच्या मृतदेहाचे लचके तोडताना पाहिलं, त्यानंतर त्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. दरम्यान या प्रकाराने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून शहरातील लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची ही नववी गंभीर घटना आहे.

आरजीआय विमानतळ निरीक्षक के बलराजू यांनी सांगितले की त्यांनी मुलाचे वडील के सूर्यकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.

Stray Dogs Killed Child
Gyanvapi Case: ज्ञानवापीच्या तळघरात पुजेच्या स्थगितीला हायकोर्टाचा नकार; मशीद समितीची याचिका फेटाळली

मजूर म्हणून काम करणारे सूर्यकुमार शमशाबाद शहरातील राजीव गृहकल्प कॉम्प्लेक्सजवळ एका तात्पुरत्या झोपडीत राहतात. बुधवारी रात्री ते त्ंयाचा मोठा मुलगा एक वर्षाचा के नागराजू , २० दिवसांचे नवजात बाळ आणि कुटुंबातील इतर सदस्य झोपडीत झोपले होते. घटना घडली तेव्हा आई मात्र त्या ठिकाणी नव्हती.

पहाटे दीडच्या सुमारास भटक्या कुत्र्यांची टोळी एका मुलाचे लचके तोडत असल्याची माहिती देत स्थानिकांनी सूर्यकुमार यांना झोपेतून उठवले. त्यांनी धावतच बाहेर जाऊन पाहिले असता मुलं मृतावस्थेत आढळलं. 'आम्ही नागराजूला दूध पाजलं आणि सव्वाबारा वाजता झोपायला गेलो, पण तेव्हा काही संशयास्पद आढळलं नाही', असे सूर्यकुमार यांनी पोलिसांना सांगितले.

यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये अंबरपेठ येथे एका चार वर्षाच्या मुलाला देखील भटक्या कुत्रांनी ठार कले होते.

Stray Dogs Killed Child
Yashasvi Jaiswal IND vs ENG : यशस्वी जयस्वालने रचला इतिहास; रोहितची भविष्यवाणी उतरवली सत्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.