संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) भारत डायनॅमिक्स कंपनीसोबत प्राणघातक ॲस्ट्रा एमके-१ क्षेपणास्त्रासाठी (Astra missile) करार केला आहे. हा करार २,९७१ कोटींचा आहे. ॲस्ट्रा एमके-१ हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दल आणि नौदलाला दिली जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ॲस्ट्रा एमके-१ हे बियाँड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूला न दिसता हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. (Defense Ministry orders Astra missiles)
भारत सरकारने संरक्षण क्षेत्रात (Defense Ministry) स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी योजनेची नुकतीच घोषणा केली होती. स्वदेशी संरक्षण आस्थापनाही सरकारला सतत पाठिंबा देत आहे. या क्षेपणास्त्राची रचना भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली आहे. याचे एकूण वजन १५४ किलो आहे. लांबी ३.८४ मीटर आणि रुंदी १७८ मिमी आहे.
हे क्षेपणास्त्र १५ किलो स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. ॲस्ट्रा एमके-१ हे क्षेपणास्त्र ११० किमी अंतरापर्यंत शत्रूवर मारा करण्यास सक्षम आहे. तसेच हे क्षेपणास्त्र २० किमी उंचीवरून शत्रूवर मारा करू शकते. त्याची कमाल गती माक ४.५ आहे. म्हणजे ते सुमारे ५,५५५ किमी प्रतितास वेगाने अंतर कापू शकते. सोबतच वेगवेगळ्या विमानातून डागता येतो.
मिग-२९यूपीजी, मिग२९के, सुखोई३०एमकेआई, तेजस एमके १/१ए आणि एलसीए एमके २/एमडब्ल्यूएफ वरूनही हे शत्रूवर गोळीबार करू शकतो. अनेक अत्याधुनिक मार्गदर्शन यंत्रणाही त्यात बसवण्यात आल्या आहेत. क्षेपणास्त्रामध्ये फायबर ऑप्टिक गायरो आधारित इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम देखील आहे. येत्या काळात डसॉल्ट मिराज २०००, तेजस आणि मिग-२९ या लढाऊ विमानांमध्येही हे क्षेपणास्त्र बसवण्याची योजना आहे. या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे काम २०१७ पासून सुरू केले होते.
अॅस्ट्रा क्षेपणास्त्राचे इतरही काही प्रकार
अॅस्ट्रा क्षेपणास्त्राचे (Astra missile) इतरही काही प्रकार तयार करण्यात आले आहेत. अॅस्ट्रा एमके १ व्यतिरिक्त एमके २ आणि एमके ३ प्रकार देखील तयार केले आहेत. या क्षेपणास्त्रांची २००३ ते २०१२ या कालावधीत जमिनीवर चाचणी घेण्यात आली. २००९ ते २०१३ दरम्यान या सुखोई ३०एमकेआ लढाऊ विमानाने यशस्वी उड्डाण केले. सोबतच मे २०१४ मध्ये पहिल्यांदा विमानातून आकाशात डागण्यात आले होते.
पहिली मोठी ऑर्डर
लडाख सेक्टरमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमेवरील अडथळ्यांदरम्यान गेल्यावर्षी आणीबाणीच्या खरेदीअंतर्गत अल्प संख्येत करारबद्ध झालेल्या ॲस्ट्रा क्षेपणास्त्रांसाठी ही पहिली मोठी ऑर्डर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रशिया-युक्रेन संकटाने भारताचे आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर, विशेषत: रशियाकडून प्रचंड अवलंबित्व उघड केले आहे आणि स्वावलंबी होण्यासाठी स्वदेशीकरण मोहिमेला गती देण्याची गरज अधोरेखित केली आहे.
आत्मनिर्भरता मिळवण्याच्या दिशेने मोठी झेप
क्षेपणास्त्र विभागात आत्मनिर्भरता मिळवण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे, असे सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे महासंचालक एअर मार्शल अनिल चोप्रा (निवृत्त) यांनी सांगितले. आम्ही रशियन आणि इस्रायली क्षेपणास्त्र प्रणालींवर दीर्घकाळ अवलंबून आहोत. ॲस्ट्रा क्षेपणास्त्राचे स्थानिक उत्पादन स्वदेशी क्षमतेतील एक महत्त्वपूर्ण अंतर भरून काढते, असे चोप्रा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.