Strong Wind Storm: वादळात शोधत होते वाट, अचानक उडत अंगावर आलं चक्क पत्र्याचं शेड.. थरारक व्हिडिओ व्हायरल

Strong Wind Storm: मध्य प्रदेशमधील एक व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्याचे दिसून येत आहे, तर लोखंडी पत्रा एखाद्या हवेत तरंगणाऱ्या एखाद्या पंतगासारखा उडताना दिसत आहे.
Strong Wind Storm
Strong Wind StormEsakal
Updated on

Strong Wind Storm: देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येत आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवत आहे. तर काही भागात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच मध्य प्रदेशमधील एक व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्याचे दिसून येत आहे, तर लोखंडी पत्रा एखाद्या हवेत तरंगणाऱ्या एखाद्या पंतगासारखा उडताना दिसत आहे.

अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे लोकांची तारांबळ उडाल्याचे दिसून येते. तर हातात काही सामान घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या पायावर एक लोखंडी पत्रा येऊन पडतो. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवत हानी झाल्याचे दिसून येत नाही.

मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी उशिरा हवामान अचानक बिघडले. खंडवा, खरगोन, देवास आणि झाबुआ येथे वादळ निर्माण झाले. वादळात परिसरातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या वादळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

खंडवा-सनावद-मोरटक्का दरम्यान वादळी वाऱ्यामुळे मोठा अपघात टळला आहे. इंदूर-इच्छापूर महामार्गावर एका हॉटेलच्या छताचे टिन शेड जोरदार वाऱ्याने उडून गेले, त्यात दुचाकीस्वाराचा तोल सुटल्याने लोखंडी अँगलवर आदळल्याने काही जण जखमी देखील झाले.

Strong Wind Storm
Latur Lok Sabha: काँग्रेसच्या या खेळीमुळे भाजपला मिळणार 'टफ फाईट'? एकतर्फी वाटणाऱ्या लातूर लोकसभेत निर्माण झाली चुरस!

हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, जबलपूर, रीवा आणि शहडोल जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. वादळाचीही शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचवेळी हवामान खात्याने मध्य प्रदेशातील या जिल्ह्यांतील लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशातील काही भागांचे हवामान बदलेल, जेथे वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, त्याच्या प्रभावामुळे, हवामानात मोठे बदल होऊ शकतो. काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील होऊ शकतो.

Strong Wind Storm
Sambhaji Nagar Loksabha Constituency : तनवाणी-दानवे अखेर एकत्र ; मनोमिलन ,गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अढी दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.