लखनऊ- उत्तर प्रदेशच्या एका मेडिकल कॉलेजमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चक्क 'धर्म' बदलल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सुभारती युनिव्हर्सिटी आहे. हे प्रायव्हेट कॉलेज आहे. याठिकाणी हा प्रकार घडलाय. 'आज तक' ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
सुभारती मेडिकल कॉलेज ही बौद्ध अल्पसंख्याक संस्था आहे. यात पहिल्या टप्प्यातील काऊंन्सिलिंगवेळी २२ जागा अल्पसंख्याक कोट्यातून भरल्या जाणार होत्या. मेडिकल कॉलेजमध्ये अल्पसंख्याक कोट्यातून एमबीबीएसची जागा मिळवण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या धर्माचे सर्टिफिकेट जोडले होते. या संदर्भात तपास करण्यात करण्यात आला होता. त्यानंतर आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. ९ विद्यार्थी तसेच पळून गेले आहेत. नीट-यूजी २०२४ मधील पहिल्या टप्प्यातील काऊंसलिंगवेळी हा प्रकार समोर आला होता.