हरियानातील हिसार जिल्ह्यात एका शाळेत घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी युट्यूबवरून बॉम्ब तयार करण्याची पद्धत शिकून, तो प्रयोग विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षिकेच्या खुर्चीखाली केला. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने या बॉम्बचा स्फोट करण्यात आला. सुदैवाने, शिक्षिका सुखरूप बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, या गंभीर प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांना शाळेतून एक आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.