Delhi Coaching Accident : कोचिंग सेंटरबाहेर विद्यार्थ्यांचा आक्रोश

दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर भागातील राऊज कोचिंग सेंटरच्या बाहेर आज सलग तिसऱ्या दिवशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आणि स्थानिकांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी दिल्ली महापालिका आणि स्टडी सर्कलच्या व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला होता.
Delhi Coaching Accident
Delhi Coaching Accidentsakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर भागातील राऊज कोचिंग सेंटरच्या बाहेर आज सलग तिसऱ्या दिवशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आणि स्थानिकांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी दिल्ली महापालिका आणि स्टडी सर्कलच्या व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला होता.

येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये (बेसमेंट) पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेचे संसदेमध्येही पडसाद उमटले होते. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना आंदोलक आयुष म्हणाला, ‘‘ कसल्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोचिंग सेंटरच्या व्यवस्थापनाविरोधात आम्ही आंदोलन करत राहू. या कोचिंग सेंटरमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण संकटात सापडले होते. पोलिसांनी आम्हाला रोखत घरी जाण्याची सूचना केली पण आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर आंदोलन करत राहू.’’ दरम्यान, या दुर्घटनेवरून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी राजघाट येथे ‘आप’च्या सरकारविरोधात धरणे आंदोलन केले. ‘

राजेंद्रनगरमधील दुर्घटना दुर्दैवी असून याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. घाईघाईत निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागल्या आहेत.

- व्ही.के.सक्सेना, दिल्लीचे नायब राज्यपाल

मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक भरपाई दिली जावी आणि सुरक्षेमध्ये त्रुटी ठेवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जावी.

- सत्यम सिंह, विद्यार्थी

तळघराचा बेकायदा वापर

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊज स्टडी सर्कलचे व्यवस्थापन हे इमारतीच्या तळघराचा वाचनालयासाठी बेकायदा वापर करत होते असे निदर्शनास आले आहे. गाळ साचल्याने या भागातील सांडपाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. याप्रकरणी आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.