भारतातील व्हेरिंयटवर फायझर-मॉडर्नाची लस ठरतेय प्रभावी

भारतातील व्हेरिंयटवर फायझर-मॉडर्नाची लस ठरतेय प्रभावी
Updated on

नवी दिल्ली : भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटने अक्षरश: धुमाकूळ माजवला आहे. जगभरातील अनेक एक्सपर्ट्स असा दावा करत आहेत की, कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटच्या विरोधात कोरोनाची लस प्रभावी ठरत नाहीये. मात्र, आता या साऱ्याच्या पार्श्वभूमीवरच अमेरिकेच्या संशोधकांनी दावा केलाय की, फायझर आणि मॉडर्नाची लस (Pfizer and Moderna Covid vaccines) कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर देखील काम करते. याबाबतचा अभ्यास NYU ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडीसीन आणि NYU लँगॉन सेंटरकडून केला गेला आहे. (NYU Grossman School of Medicine and NYU Langone Center) मात्र, अद्यापतरी याचे निष्कर्ष कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित झाले नाहीयेत. (Study says Pfizer Moderna Vaccines Effective Against India Dominant Covid Variant)

भारतातील व्हेरिंयटवर फायझर-मॉडर्नाची लस ठरतेय प्रभावी
'कोरोना रोको, जनता के सवाल नहीं'

या अभ्यासावर लक्ष ठेवणाऱ्या एका संशोधकाने सांगितलंय की, या स्टडीमध्ये लशीच्या एंटीबॉडी नव्या व्हेरिंयटच्या विरोधात थोड्या कमकुवत आहेत, मात्र तरीही लस या व्हेरियंटच्या विरोधात लढण्यासाठी पुरेशी आहे. याचा अर्थ आपण हे म्हणू शकतो की, फायझर आणि मॉडर्नाची लस भारतामध्ये कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटच्या विरोधात प्रभावी आहे.

संशोधनात काय आढळलं?

अमेरिकेमध्ये सध्या फायझर आणि मॉडर्नाची लस दिली जात आहे. संशोधन करणाऱ्या संशोधकांनी अशा लोकांचे सॅम्पल घेतले आहेत ज्यांना ही लस दिली जात आहे. यानंतर लॅबमध्ये या गोष्टीचा शोध घेण्यात आला की, या दोन्ही लशी भारतातील कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट B.1.617 आणि B.1.618 च्या विरोधात काम करतात अथवा नाही. संशोधकांच्या म्हणण्यानुसार B.1.617 चा प्रभाव ही लस चौप्पट कमी करते. तर B.1.618 च्या विरोधात ही लस तिप्पट प्रभावी आहे.

भारतातील व्हेरिंयटवर फायझर-मॉडर्नाची लस ठरतेय प्रभावी
अमेरिका आणखी दोन कोटी डोस पुरविणार; बायडेन यांची घोषणा

जगातील नंबर वन लस?

एका अभ्यासानुसार, फायझर लशीची परिणामकारकता सर्वाधिक म्हणजेच 95 टक्के आहे तर मॉडर्नाचा प्रभाव 94.1 टक्के असल्याचं मानलं जातंय. अधिकतर संशोधक फायझर लशीला सर्वाधिक यशस्वी मानत आहेत. ही लस mRNA तंत्रज्ञानावर काम करते. भारत सरकार सध्या या दोन्ही कंपन्यांशी चर्चा करत आहे आणि ही लस भारताला मिळेल अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()