नेताजींच्या अस्थी परदेशात असणं अपमानास्पद बाब; सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने PM मोदींना लिहीलं पत्र, केली मोठी मागणी

Grandnephew Chandra Kumar Bose, Writes to PM Modi : ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींना भारतात परतायचे होते, मात्र त्या आधीच १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचे विमान अपघातात निधन झाले,’’ असे चंद्रकुमार म्हणाले.
Subhas Chandra Bose grandnephew writes to PM Modi to Bring back Netaji mortal remains from Japan
Subhas Chandra Bose grandnephew writes to PM Modi to Bring back Netaji mortal remains from Japan
Updated on

कोलकता : ‘‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी १८ ऑगस्टच्या आत जपानमधून भारतात आणाव्यात’’ अशी मागणी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी रविवारी केली. जपानमधील टोकियो येथील रेनकोजी मंदिरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी असल्याचे मानले जाते. चंद्रकुमार यांनी पंतप्रधान मोदी यांना रविवारी याबाबत पत्र लिहिले आहे.

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नेताजींच्या मृत्यूबद्दल सत्य शोधण्यासाठीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहा शोध समित्यांचे अहवाल प्रसिद्ध केले आहेत यावरून नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान येथे विमान अपघातात झाल्याचे सिद्ध होते. सरकारने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करावे ज्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाबद्दल करण्यात येणारे विविध दावे प्रतिदावे बंद होतील, असे आवाहनही चंद्रकुमार यांनी केले आहे.

नेताजींना भारतात परतायचे होते


‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींना भारतात परतायचे होते, मात्र त्या आधीच १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचे विमान अपघातात निधन झाले,’’ असे चंद्रकुमार म्हणाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानीच्या अस्थी परदेशात असणे ही अपमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादनही चंद्रकुमार यांनी केले. मागील साडेतीन वर्षांपासून नेताजींच्या अस्थी भारतात परत आणाव्यात यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Subhas Chandra Bose grandnephew writes to PM Modi to Bring back Netaji mortal remains from Japan
'इथे' महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना बनवतात नपुंसक; नेमका काय आहे कायदा?

सरकारने स्पष्ट करावे


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रेनकोज मंदिरातील अस्थिंबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत असून त्या अस्थी नेताजींच्या नाहीत असाही एक युक्तिवाद करण्यात येत आहे. याबाबत बोलताना चंद्रकुमार म्हणाले की, जर ‘त्या’ अस्थी या नेताजींच्या नसतील तर सरकारने तसे स्पष्ट करावे त्याचप्रमाणे जर त्या अस्थी नेताजींच्या नसतील असे सरकारचे मत असेल तर सरकारकडून त्या अस्थींच्या व्यवस्थापनासाठी पैसे देणे बंद करण्यात यावे. सरकारने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून संभ्रम दूर करावा अशी मागणी चंद्रकुमार यांनी केली आहे.

Subhas Chandra Bose grandnephew writes to PM Modi to Bring back Netaji mortal remains from Japan
Jayant Patil : धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "तो आमचाच..."

हिंदू प्रथेनुसार अंत्यविधी


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस फाफ यांना नेताजींचे अंतिम विधी हिंदू पद्धतीने करण्याची इच्छा आहे, असे प्रतिपादन चंद्रकुमार बोस यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.