Success Mantra : देशातील श्रीमंतांच्या यादीत वरच्या स्थानी असणारे रिलायंस इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांना क्वचितच कोणी ओळखत नसेल. त्यांचे नाव यशस्वी लोकांच्या यादीत मानाने घेतले जाते. यश मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रम घेत असतो. आज आपण श्रीमंतांच्या यादीत मोडणाऱ्या मुकेश अंबानींच्या यशाचे रहस्य जाणून घेऊयात.
प्रत्येक व्यक्तीस जीवनात कधीतरी अपयशातून जावेच लागते. अशा परिस्थितीत अपयशाने खचून न जाता त्यातून शिकण्याची गरज असते. अपयशाचा सामना करून पुढे जात तुम्ही यशाची पायरी कशी गाठता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे.
एका मुलाखतीत मुकेश अंबानीनी सांगितले होते की, प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यक्तीने कायम तत्पर राहावे. तुमचा हाच गुण तुम्हाला यश मिळवून देतो. अंबानी म्हणतात, यश मिळवण्यासाठी व्यक्तीने कायम स्वत:च्या मनाचे ऐकावे.
कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे. तुमचे ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे हे तुम्हाला ठरवता येईल. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आधी ध्येय निश्चित करायला हवे.
तुम्ही कुठलेही काम हाती घेतल्यानंतर त्याबाबत तुमचे विचार सकारात्मक असायला हवे. तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, पण तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत सकारात्मक राहायला हवे. अशा दृष्टिकोण बाळगणारे लोक आयुष्यात पुढे जातात.
मोठी स्वप्न बघण्याची प्रेरणा मुकेश अंबानी यांनी त्यांचे वडील धीरूभाई अंबानींकडून घेतली होती. त्यांनी ५०० रुपयांचा फोन लाँच करून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस तो फोन दिला. मुकेश अंबानींचा हा विचार इतरांच्या तुलनेत वेगळा आहे. हेच विचार तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.