Success Story : शिक्षण अर्धवट सोडून कॉफीवेड्या देशाला चहाचे व्यसन लावणारा चहावाला; आज आहे दशलक्ष डॉलर्सच्या कंपनीचा मालक

म्हणूनच कदाचित परदेशातही चहा पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे
Success Story
Success Story esakal
Updated on

Success Story : शिक्षण आपल्या जीवनाला अर्थ देते. आपल्या दोनवेळच्या भाकरीची सोय करते, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. पण, याला फाटा देत आजकाल अनेक तरूण व्यवसायाची वेगळी वाट निवडत आहेत. कारण, शालेय शिक्षण तूम्हाला शिक्षित करेल पण, रोजगार देईल याची शाश्वती देता येत नाही.

Success Story
Success Story : धुळेच्या तरुण अभियंत्याने पुण्यात फुलवला आठवडे बाजार

त्यामूळेच ऑस्ट्रेलियन विद्यापीठात बीबीएचा शिकणाऱ्या एका तरूणाने ते शिक्षण सोडून चहा विकण्याचा व्यवयास सुरू करून दशलक्ष डॉलर्सच्या कंपनीचा मालक बनला. आहे. जाणून घेऊयात या तरूणाची यशोगाथा...

Success Story
Success Story : गवंड्याच्या मुलाला Para Commandoचा बहुमान!

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते लहानपणी चहा विकत होते असे सांगितले. आणि तरूणांमध्ये चहा विकण्याचे फॅडच आले. मोदी सतत परदेश दौरे करत असतात यामूळेच ते चहावाला होते हेही परदेशात पोहोचले आहे. त्यामूळे कदाचित परदेशातही चहा पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

► Global Maharashtra News: https://www.youtube.com/playlist?list...

याचाच फायदा करून घेत संजीत कोंडा या तरूणाने मेलबर्नमधील लोकांना चहाचे व्यसन लावले आहे. संजीत मूळचा भारतीय विद्यार्थी आहे. संजीत ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कोर्स शिकत होता.

Success Story
Success Story: माळमाथ्यावरील भुमिपूत्र मंत्रालयात लिपीक; प्रशांत जाधवांच्या परिश्रमाला फळ

पण, त्यात तो नापास झाला. नापास झाला म्हणून शिक्षण अर्धवट सोडलेल्या संजीतने परक्या देशात जिद्द कायम ठेवली आणि एक वेगळी वाट निवडायचा निर्णय घेतला. संजीतने मेलबर्नमध्ये 'ड्रॉपआउट चायवाला' नावाचा स्वतःचा स्टार्टअप बिझनेस सुरू केला.

Success Story
Success Story : रिक्षाचालकाच्या लेकीला मिळाले 8 लाखांचे पॅकेज

केवळ कॉफी पिणाऱ्या लोकांना चहा पाजणे इतके सोपे नव्हते. पण, माझ्यासोबत एक पॉझिटीव्ह शक्ती होती. आणि ती म्हणजे माझी आई. मी सध्या २२ वर्षाचा आहे. या २२ वर्षाच्या काळात माझ्या आईला रोज सकाळी चहा करताना पाहिले होते. त्यातूनच मला हा मार्ग सापडला आणि मी या व्यवसायात उतरायचे ठरवले.

Success Story
Success Story : सायकल दुरुस्ती करणाऱ्याच्या मुलाची 'गरूडझेप'

सध्या मेलबर्नमधील लोक कॉफी नाही तर चहा आणि सामोसे खाऊन सकाळची सुरूवात करतात. आणि त्याच पदार्थाने त्यांचा दिवसही संपतो, असे संजीतने सांगितले. मेलबर्नमधील लोकांना मसाला चहा आवडतो. त्यामूळे कामाच्या घाईतही अनेक लोक दोन मिनीटे थांबून चहाचा आस्वाद घेतात.

Success Story
Success Story : निरक्षर दांपत्याचा मुलगा बनला 'CA'

ऑस्ट्रेलीयातील मेलवर्न येथे स्टार्ट-अप व्यवसाय 'ड्रॉपआउट चायवाला'ची सुरूवात झाली. आता हा व्यवसाय लाखो डॉलर्स कमावणाऱ्या कंपनीत रूपांतर झाले असल्याची माहितीही संजीतने दिली. पुढील महिन्यात आमच्या या स्टार्टअपचा टर्नओव्हर 5.2 कोटी पर्यंत पोहोचेल. असेही तो म्हणाला.

Success Story
Success Story: कॉर्पोरेट नोकरी सोडून तरूण वळाला देशी गोवंश संवर्धनाकडे

'ड्रॉपआउट चायवाला' साठी संजीतची कंपनी भारतातून चहाची आयात करतो. त्यांच्या या स्टार्टअपमध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना रोजगारही दिला आहे. हे विद्यार्थी आपला खर्च भागवण्यासाठी संजीतकडे पार्टटाईम नोकरी करतात. अनेक अशा या ‘चायवाल्या’ने भारतीय तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.