Success Story : करोडोंची नोकरी नाकारली अन् 'फिजिक्स वाला' म्हणून त्याने बनवली स्वत:ची वेगळी ओळख

आयआयटीमध्ये प्रवेश घेता आला नाही म्हणून खचून न जाता अशा इतर विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली ती 'फिजिक्स वाला'ने
Success Story
Success Story esakal
Updated on

Success Story Of Physics Wala : दरवर्षी लाखो विद्यार्थी IIT-JEE, CAT आणि UPSC सारख्या कठीण परीक्षांसाठी अभ्यास करत असतात. अथक प्रयत्नांनतरही काही विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. त्यामुळे आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच राहतं. मात्र आयआयटीमध्ये प्रवेश घेता आला नाही म्हणून खचून न जाता अशा इतर विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली ती 'फिजिक्स वाला'ने.

फिजिक्स वाला म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या या व्यक्तीचे नाव अलख पांडे. ज्याला शिक्षणाच्या क्षेत्रात त्याच्या कामामुळे 'फिजिक्स वाला' अशी ओळख मिळाली. जेईई क्रॅक करण्यास अयशस्वी ठरलेल्या अलख पांडेने एका दुसऱ्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र बीटेक ची डिग्री न घेताच त्याने कॉलेज सोडले आणि टीचिंग प्रोफेशनमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

मोबाईलपासून सुरुवात

अलख पांडेने डिजीटल युगात एज्युकेशन सेक्टरमध्ये पाऊल ठेवले. प्रोफेसर म्हणून कॉलेजमध्ये क्लास न घेता त्याने यूट्यूब चॅनलद्वारे शिकवण्यास सुरुवात केली. आज शिकवणीच्याच बळावर त्याने कोट्यावधींची कंपनी उभी केली आहे.

अलख पांडेची पहिली कमाई पाच हजार रुपये होती. ही त्याची पहिली ट्यूशन फिस होती. हळूहळू ट्यूशन चॅनलच्या माध्यमातून अलख प्रसिद्धीझोतात आला. आता संपूर्ण देशभरात तो फिजिक्सवाला या नावाने ओळखला जातो. (Motivational Story)

Success Story
Success Story: ...जेव्हा आयुष्याच्या वळणावर यू-टर्न येतो! टायर पंक्चर काढणारा अहमद बनणार न्यायाधीश

यूपीच्या तरुण उद्योजगांपैकी एक

मीडिया रिपोर्ट्सनुसार अलखने अथक प्रयत्नांतून जवळपास ९१०० कोटी रुपयांची अॅडटेक कंपनी उभी केली आहे. यूपीच्या तरुण उद्योजगांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. त्याचे एकूण ६१ यूट्यूब चॅनल्स आहेत. ज्यावर ३१ मिलियनहून अधिक यूजर्स अॅक्टिव्ह आहेत.

अॅडटेक कंपनी सुरु केल्यापासून ती फायद्यातच आहे. फिजिक्स वाला अलख पांडेच्या कंपनीला २०२१ मध्ये ९.४ कोटी, २०२२ मध्ये १३३.७ कोटी आणि २०२३ मध्ये १०८ कोटींचा फायदा झालेला आहे.

खडतर परिस्थितीत दिवस काढून यशाची उंची गाठणाऱ्या अलख पांडेचे नाव प्रयागराजमधील श्रीमंत उद्योजकांमध्ये घेतले जाते. डीएनए रिपोर्टनुसार अलख पांडेची संपत्ती ४४०० कोटी असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.