Success Story : पठ्ठ्याने सुरू केली भांग फास्ट फूड कंपनी ; 25 लाखांचा आहे टर्नओव्हर!

काय सांगताय! भांगेपासून बनलेले पदार्थात असतात एवढे प्रोटीन्स
The Hemp Factory
The Hemp Factory Esakal
Updated on

तुम्ही रोजच्यापेक्षा दोन घास जास्त खाल्ले तरी दिवसभर झोप यायला लागते. पुरणपोळीच्या आणि जास्त मसाल्याच्या जेवणाबाबत तर हमखास असे होते. मग समजा तुमच्या जेवणात कोणीतरी भांग मिसळली तर काय होईल?. भांग केवळ लस्सी किंवा ताकामध्ये घालतात. पण, एक अवलिया आहे ज्याने भांगेपासून पदार्थ बनवले आणि त्याचे स्टार्टअप सुरू केले आहे. त्याने भांगेपासून बनवलेले पदार्थ खाण्यासाठी लोकांची गर्दी असते.

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या 'द हेम्प फॅक्टरी'मध्ये हे पदार्थ मिळतात. 'हॅम्प' म्हणजे गांजा. ही गांजाची फॅक्टरी असल्याचे त्याच्या नावावरूनच लक्षात येते. हा यशस्वी प्रयोग करणाऱ्या धवल पांचाळने ही कंपनी सुरू केलीय. तो भांगच्या पिठापासून पिझ्झा, बर्गर आणि बरेच पदार्थ बनवतो. अशी कंपनी सुरू करायला त्याला परवानगी कोणी दिली. नेमका काय प्रकार आहे. पोलिसात तक्रार द्यायला हवी, असे प्रश्न तूमच्याही मनात आले असतील. तर, थांबा आधी हे वाचा. या सर्व प्रश्नांची उत्तरे धवलने दिली आहेत. आणि ती उत्तरे वाचून लोक त्याच्याकडे अधिकच आकर्षित होत आहेत.

The Hemp Factory
Ram Gopal Varma: रामभाऊ अभिनेत्रीचे पाय चाटायचेच बाकी राहिले! किसिंग करत सुटले

माझ्या जीवनात जेव्हा खूप मोठी दु:खद घटना घडली होती, तेव्हा मला भांगेपासून बनणाऱ्या पदार्थांची कल्पना सुचली. 2014 मध्ये माझे वडील कॅन्सरशी झुंज देत होते. त्यामूळे मी कोणते चांगले उपचार त्यांच्यावर करता येतील याची माहिती घेत होतो. आजही भारतात कर्करोगावर दोनच उपचार आहेत, एक केमोथेरपी आणि दुसरी रेडिएशन थेरपी. त्यामूळे मी कॅन्सरवर दुसरा कोणता जालिम उपाय आहे हे शोधत होतो.

संशोधनादरम्यान मला गांजापासून बनणाऱ्या तेलाविषयी माहिती मिळाली. कॅन्सरच्या उपचारासाठी त्याचा वापर केल्याचे मला सापडले. भारतात ते कायदेशीर नसले तरी वैद्यकीय वापरासाठी त्याची परवानगी आहे. मी यासंबंधी काही अधिक माहिती मिळते का ते शोधत होतो. त्यावेळी मला एक फेसबुक पोस्ट सापडली. त्यामध्ये एका व्यक्तीने भांगाचे तेल वापरून आपल्या बहिणीला स्तनाच्या कर्करोगापासून वाचवले होते. मी ते वाचताच त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आणि 3 महिन्यांनंतर माझा त्यांच्याशी संपर्क झाला.

The Hemp Factory
Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी; वाचा निकालाचे अपडेट्स

त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर मी वडिलांसाठी गांजाचे तेल आणले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यादरम्यान माझ्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर 2017 मध्ये मी भांगेपासूनच औषधे बनवणाऱ्या 'बॉम्बे हीप' कंपनीत जॉईन झालो. तिथे मी 4 वर्षे काम करत होतो. त्यादरम्यान मी भांगेपासून अजून काय व कसे बनवायचे याचा रिसर्च केला. तशी कोणतीही कंपनी नाही हे माझ्या लक्षात आले. त्यावेळी मला असे वाटले की, भांगेत औषधी गुणधर्म असतात त्यामूळे त्यापासून खाण्याचे पदार्थ बनवता येऊ शकतात हे माझ्या लक्षात आले.

The Hemp Factory
Green Tea Disadvantage: ग्रीन टी पिताय? मग हा धक्कादायक खुलासा एकदा वाचाच; तुमचे गैरसमज दूर होतील

सामान्य पिझ्झा ब्रेड हा मैद्यापासून बनवला जातो आणि तो आरोग्यासाठी धोकादायक असतो. पण भांगाच्या पिठात प्रथिने, कॅनाबिनॉइड्स, जीवनसत्त्वे याशिवाय पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स म्हणजेच ओमेगा-2,3,6 असतात. त्यामुळेच या पीठापासून बनवलेला पिझ्झा खाणे हानिकारक नसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे गांजा हा नशिला पदार्थ आहे. पण त्यापासून बनवलेला पिझ्झा खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची नशा चढत नाही.2021 मध्ये मी भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने (FSSAI) भांगेच्या बियांपासून बनवलेल्या खाद्य उत्पादनांना कायदेशीर मान्यता दिलीय. कारण त्यामूळे नशा होत नाही. हे आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामूळे मी या संधीचे सोनं करत हा स्टार्टअप सुरू केला आहे.

मी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आणि त्यानंतर 'बॉम्बे हेम्प' कंपनीत काम करताना गांजाची पेरणी, काढणी आणि नंतर त्याचा पुढील वापर याविषयी संपूर्ण माहिती गोळा केली. मी भांगापासून बनवलेल्या पिझ्झामध्ये 60% मैदा आणि 40% भांगाचे पीठ मिसळतो. जर मी 100% केवळ भांगाचे पीठ वापरले तर ते कडुनिंबाच्या पानांपेक्षा अधिक कडू लागते.

The Hemp Factory
Food Eating Tips: रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका नाहीतर...

'द हेम्प फॅक्टरी'च्या कन्सेप्टबद्दल मी एका मित्राला सांगितले. तो पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ आहे. त्याला ते खूप आवडले आणि ते काहीतरी चमत्कारीक वाटले. 6 महिन्यांनंतर त्याने त्यापासून एक रेसिपी तयार केली. ज्यामध्ये वेगवेगळ्या फास्ट फूडसाठी भांगाचे पीठ आणि बियांचे प्रमाण लिहिले होते. यानंतर मी मित्र आणि पत्नीच्या सोबतीने ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला मला महिन्याभरात 50 पेक्षा जास्त ऑर्डर मिळत होत्या. पण आता मला एका महिन्यात 500 पेक्षा जास्त ऑर्डर मिळतात.

The Hemp Factory
Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’साठी पुण्यनगरी सज्ज

गांजापासून तयार होणारा कच्चा माल महाग असतो. त्यामूळे गांजापासून बनवलेल्या फास्ट फूडची किंमत सध्या 300 ते 500 रुपये आहे. मला उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून गांजाच्या बिया मिळतात. भारतातील बहुतेक ठिकाणी त्याची लागवड बेकायदेशीर आहे. म्हणून एक किलो बियाण्याची किंमत 600 रुपये आहे. तर पीठाची किंमत 800 रुपये किलो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.