एका उच्चशिक्षीत महिलेने स्वतःच्या मुलाची हत्या केल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान गोव्यातील एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सीईओ महिलेची पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.
यादरम्यान शुक्रवारी (12 जानेवारी) पोलिसांना मुलाचा मृतदेह तिने सूटकेसमध्ये कसा पॅक केला हे दाखवलं. तसेच आरोपी सूचना सेठने आत्महत्येच्या प्रयत्नात ज्या कटरने आपले मनगट कापून घेतले होते ते कटरही पोलिसांना दाखवले.
पोलीस एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठला त्याच अपार्टमेंटमध्ये घेऊन गेले, जेथे मुलाची हत्या केल्याचा तिच्यावर आरोप आहे. हत्येचं दृश्य पुन्हा रिक्रीएट करण्यासाठी पोलीस सूचना सेठला तेथे घेऊन गेले होते. मात्र, सूचनाने पुन्हा एकदा आपल्या मुलाची हत्या केल्याचे नाकारले आहे. ती आपला मुलगा मृतावस्थेतच आढळला असल्याचे सातत्याने सांगत आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी महिला तपासात सहकार्य करत नव्हती आणि ती गुन्ह्याच्या ठिकाणी जाण्यासही तयार नव्हती, परंतु तिची समजूत घालून तिथं नेण्यात आलं. पोलिसांनी तासभर घटनास्थळी राहून तपास केला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला होता.
प्रकरण काय आहे?
आपल्याच चार वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली सूचना सेठ एका एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ आहे. सूचनाचा पतीपासून घटस्फोट झाला होता. दोघेही वेगळे राहत होते. दोघांनाही एक मुलगा होता, ज्याचा ताबा सूचनाकडे होता, पण पोलिसांनी पतीलाही त्याला भेटण्याची परवानगी दिली होती.
सूचनाने आपल्या मुलाची हत्या केली त्याच आठवड्यात तिचा नवरा तिला भेटायला येणार होता. मात्र मुलाच्या हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, आतापर्यंतच्या तपासातून मुलाच्या ताब्यावरुन पतीसोबत सुरू असलेल्या भांडणामुळे ती अस्वस्थ असल्याची माहिती पोलिसांना समोर आली आहे. पोलिसांना सूचनाच्या सामानातून एक चिठ्ठी सापडली आहे ज्यामध्ये तिने इंग्रजीमध्ये लिहिले आहे की ती आपल्या पतीला त्यांच्या मुलाचा ताबा मिळवू देणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.