Sudha Murthy Video Viral: सुधा मूर्तींनी हात जोडून दिला होता खासदारकीला नकार, राजकारणाचे नारायण मूर्ती यांना का आहे वावडे ? Viral Video

Sudha Murthy Video Viral: नारायण मूर्ती यांनी आता राजकारणात करिअर करण्याचा विचार करता का यावर एका कार्यक्रमात प्रतिक्रीया दिली होती. तर सुधा मूर्तींनी हात जोडून दिला होता नकार.
Sudha Murthy Video Viral
Sudha Murthy Video ViralEsakal
Updated on

Sudha Murthy Video Viral: प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली. सुधा मुर्ती यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत महिला दिनी मोदींनी त्यांना या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती आणि नारायण मूर्ती यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी NDTVच्या एका कार्यक्रमात इन्फोसिसचे कंपनीतून निवृत्ती घेतल्यानंतर पुढे कोणते प्लान केले आहेत. त्याबाबत सांगितले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते, राजकारणात जाण्याबाबत कोणताही वितार नाही, कारण 78 वर्षीय नारायण मूर्ती यांचा असे वाटते की, त्याचे वय खूप झाले आहे.

"मला वाटते की मी यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी खूप म्हातारा झालो आहे. मी आता 78 वर्षांचा आहे," आता राजकारणात करिअर करण्याचा विचार करणार का असे विचारले असता ते म्हणाले होते.

Sudha Murthy Video Viral
Sudha Murty Nominated as MP: सुधा मूर्तींची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती; राष्ट्रपतींनी केलं नॉमिनेटेड

पुढे बोलताना ते म्हणाले होते, पुढचा वेळ ते आपल्या मुलांसोबत आणि नातवंडांसह घालवण्याची योजना आखत आहेत. त्याचबरोबर संगीताचा आनंद घेण्याची आणि भौतिकशास्त्रापासून अर्थशास्त्रापर्यंतच्या विविध विषयांवर वाचन करण्याची त्याची इच्छा आहे.

राजकारणात जाण्याबाबत काय म्हणाल्या होत्या सुधा मुर्ती

लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांनी देखील सांगितले की, जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना राजकारणात येण्याची गरज नाही.

"मी समाज सेवा केली आहे, मी लोकांना मदत केली आहे. मी 14 राष्ट्रीय आपत्ती आणि एक साथीचा रोगात कामे केली आहेत. परंतु मला त्यासाठी कोणत्याही पदाची आवश्यकता नाही. मी अशा प्रकारे आनंदी आहे. मला वेगळ्या प्रकारे लोकांची सेवा करायची आहे आणि त्यातून चांगली नैतिक मूल्ये द्यायची आहे", असंही त्या म्हणाल्या होत्या.

Sudha Murthy Video Viral
Amritpal Singh: खलिस्तानी अमृतपाल सिंगच्या सुरक्षेत मोठी चूक, थेट अधीक्षकांना अटक; UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सुधा मूर्ती यांनी संसद भवनाला भेट दिली होती. त्यावेळी, त्यांना खासदार होण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळीची त्यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद सभागृहाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी, "खूपच सुंदर... अतिशय सुंदर... वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला खूप वर्षांपासून संसदभवन पाहण्याची इच्छा होती. आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. येथील संसद भवनातील कलाकूसर, संस्कृती आणि इतिहास सर्वकाही अतिशय सुंदर आहे," असं म्हटलं होतं.

त्यावेळी, सुधा मूर्ती यांना खासदार बनून येथे येऊ इच्छिता का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, मी जिथे आहे तिथे आनंदी आहे म्हणत त्यांनी हात जोडून नम्रपणे नकार दिला होता. मात्र, आता त्या खरंच खासदार बनून संसदेच्या सभागृहात जाणार आहेत. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Sudha Murthy Video Viral
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! १४ मुलांना वीजेचा धक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.