NCERT चा अभ्यासक्रम ठरवण्याच्या नव्या समितीत सुधा मूर्ती, शंकर महादेवन

NCERT school textbooks syllabus एनसीईआरटीने NCERT अभ्यासक्र, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक अभ्यास ठरवण्यासाठी नव्या समितीची स्थापना केली आहे.
sudha murty shankar mahadevan
sudha murty shankar mahadevanesakal
Updated on

NCERT school textbooks syllabus

नवी दिल्ली- एनसीईआरटीने NCERT अभ्यासक्र, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक अभ्यास ठरवण्यासाठी नव्या समितीची स्थापना केली आहे. तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम या समितीच्या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ने दिलेल्या माहितीनुसार समितीमध्ये लेखिका आणि इन्फोसिस Infosys च्या संस्थापक सदस्य सुधा मूर्ती, गायक शंकर महादेवन, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीतीचे प्रमुख बिबेक डेब्रोय, आर्थिक सल्लागार समितीतील सदस्य संजिव सन्याल, आरएसएस विचारधारेचे चामू क्रिश्ना शास्त्री यांचा समावेश असणार आहे. (Sudha Murty Bibek Debroy Shankar Mahadevan on govt new panel to develop NCERT school textbooks syllabus)

NIEPA चे कुलपती महेश चंद्रा पंत १९ सदस्यांच्या National Syllabus and Teaching Learning Material Committee (NSTC) समितीचे अध्यक्ष असतील.एनसीईआरटीच्या एका कागदपत्रातून ही बाब समोर आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने National Curriculum Framework for School Education (NCF-SE) च्या माध्यमातून अभ्यासक्रमातात बदल करण्यात आला आहे. अभ्यासक्रम निश्चिती NCF-SE च्या २१ सदस्याची केली आहे. ही समिती २०२१ च्या सप्टेंबरमध्ये स्थापन करण्यात आली होती. समितीने आपली अहवाल केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्याकडे सादर केले होते.

sudha murty shankar mahadevan
New Bill: लग्न किंवा नोकरीचे आमिष दाखवून महिलेशी संबंध ठेवल्यास होणार 'इतके' वर्षे तुरुंगवास

२१ जुलैतील NCERT च्या माहितीनुसार, नवीन समिती NCF-SE चा संदर्भ घेऊन नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तके निश्चित करेल. एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, समितीमध्ये अनेक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. नवीन समितीने ठरवलेला अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहेत. यादृष्टीनेच अभ्यासक्रम तयार केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.