Sudha Murty: सुधा मूर्तींनी खासदार म्हणून पहिल्यांदाच केलं राज्यसभेत भाषण; सर्वत्र होतंय कौतुक

इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी राज्यसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात जोरदार मुद्दे मांडले.
Sudha Murty
Sudha Murty

नवी दिल्ली : इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी राज्यसभेतील खासदार म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात जोरदार मुद्दे मांडले. महिलांबाबतचे विषय आणि मुद्देसूद मांडणीमुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होतं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणलेल्या धन्यवाद प्रस्तावावर वरिष्ठ सभागृहात होत असलेल्या चर्चेत त्या सहभागी झाल्या होत्या. (Sudha Murty made a speech in Rajya Sabha for first time as MP got appreciation)

Sudha Murty
Hemant Soren: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री; चंपई सोरेन यांनी दिला राजीनामा

सुधा मुर्ती यांनी म्हटलं की, "आपली सामाजिक व्यवस्था अशी आहे ज्यामध्ये महिला आपल्या आरोग्यावर पुरेस लक्ष देऊ शकत नाहीत. जेव्हा त्या रुग्णालयात दाखल होतात तेव्हा त्यांच्यामध्ये सर्व्हाकल कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला पोहोचलेला असतो, त्यांना वाचवणं अवघड होऊन जातं. माझे वडील सांगायचे की महिला कुटुंबाचा केंद्रबिंदू असते, कारण महिलेच्या निधनानंतर पती दुसरं लग्न करु शकतो पण मुलांसाठी दुसरी आई मिळू शकत नाही"

Sudha Murty
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत नवी अपडेट; आता एकाच घरातील 'इतक्या' महिलांना मिळणार लाभ

कोविडच्या काळात जसं देशव्यापी लसीकरण अभियान चालवलं गेलं तसंच महिलांसाठी सर्व्हाकल कॅन्सरपासून वाचण्यासाठी लसीकरण अभियान का चालवलं जाऊ शकत नाही? जर सरकारनं यासाठी प्रयत्न केले तर ते जास्त महागडही राहणार नाही, याचा मोठ्या लोकसंख्येला फायदा होईल.

Sudha Murty
Bhushi Dam: भुशी डॅम जवळ वाहून गेलेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 लाखांची भरपाई; अजित पवारांची घोषणा

पर्यटनावर भाष्य करताना सुधा मूर्ती म्हणाल्या, लोक नेहमी अजिंठा-वेरुळ आणि ताजमहाल पाहायला जातात. पण भारतात ४२ जागतिक वारसा स्थळं आहेत त्यांचा जास्त प्रचार-प्रसार झालेला नाही. आपल्या देशाची ही संस्कृती सर्वांना कळायला हवी. दक्षिण भारतातच अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांचा इतिहास गौरवशाली आहे. त्रिपुरात उनाकोटीची कोणालाही माहिती नाही, हे स्थळ १२,५०० वर्षांहून अधिक जुनं आहे.

काश्मीरच्या मुघल गार्डनचा जागतिक वारसा स्थळात समावेश नाही. याकडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यांनी पुढे सांगितलं की, गुजरातमध्ये लोथल आणि धौलावीरा, वाराणसीजवळ सारनाथ, मध्य प्रदेशात मांडू किल्ला, कर्नाटकमध्ये श्रवण बेलगोलाचं मंदिर, काय नाही आपल्याकडं? आपल्याला याचा योग्य प्रचार-प्रसार करायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com