उगार खुर्द (जि. बेळगाव) - कर्नाटकातील सर्व साखर कारखाने चालू झाले आहेत. १२ दिवसांत अनेक कारखान्यांनी लाखांवर टन ऊस गाळप केले आहे.
कर्नाटकातील हंगाम सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रातील मजूर न आल्यामुळे अजून गती नाही. महाराष्ट्रातील कारखानदार निवडणुकीत असल्याने तेथील २३ च्या निकालानंतरच कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकातील कारखान्यांच्या पथ्यावर हा हंगाम पडत आहे.