नवी दिल्ली : बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याचं प्रमाण तब्बल २४ टक्क्यांनी वाढलं असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २०१६ पासून २०१९ पर्यंत हे प्रमाण वाढलं असल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोने (National Crime Records Bureau) सांगितलंय. २०१६ मध्ये २२९८ लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर २०१९ साली २८५१ लोकांनी बेरोजगारीच्या कारणामुळे आत्महत्या केली असल्याचं NCRB कडून सांगण्यात आलंय. २०१९ साली बेरोजगारीमुळे सर्वाधिक आत्महत्या या कर्नाटक राज्यात (५५३) झाल्या आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्र (४५२) आणि तमिळनाडू (२५१) ही राज्ये आहेत.
विशेष म्हणजे NCRB ने दिलेली ही माहिती कोरोनापूर्व काळातील आहे. कोरोना महासंकटाच्या काळात लागू झालेलं लॉकडाऊन आणि दरम्यानच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीनंतर या आकडेवारीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) चे प्रमुख महेश व्यास यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास १० दशलक्षाहून अधिक लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. तर कोरोना महासंकटाचा हा काळ सुरु झाल्यापासून जवळपास ९७ टक्के घरांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
NCRB ने संसदेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १८ वयोगटातील २४ हजार हून अधिक मुलांनी २०१७-१९ या काळात आत्महत्या केल्या आहेत. परीक्षेत नापास झाल्याच्या अथवा अपेक्षित यश न मिळाल्याच्या कारणांमुळे ४ हजारहून अधिक मुलांनी या आत्महत्या केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार, २०१७ ते २०१९ च्या दरम्यान 24,568 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये 13,325 मुलींचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.