Sukesh Chandrashekhar : जॅकलीनचा सुकेश आणखी गोत्यात; नव्या प्रकरणानं घेरलं

पटियाला हाऊस कोर्टाने सुकेश चंद्रशेखरला 9 दिवसांच्या ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.
Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez
Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez Esakal
Updated on

Sukesh Chandrashekhar : दोनशे कोटींच्या फसवणूक प्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, एका नव्या प्रकरणात ED ने सुकेशला अटक केली आहे.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

ईडीकडून सुकेशला गुरूवारी अटक करण्यात आली असून, त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले असता कोर्टाने सुकेश चंद्रशेखरला 9 दिवसांच्या ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.

रेलिगेअर एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​माजी प्रमोटर मलविंदर सिंग यांच्या पत्नी जपना सिंग यांची 3.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez
Kasba Bypoll Election : कसब्यात खळबळ! प्रचारादरम्यान सापडली लाखोंची रोकड

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने सुकेशला नऊ दिवसांच्या ईडी कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सुकेशला त्याच्या वकिलाला दररोज 15 मिनिटे भेटण्याची परवानगी दिली आहे.

या गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ईडीने सुकेशच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez
Pujara 100th Test : शाहरूखने मदत केली नसती तर, 14 वर्षांपूर्वी संपलं असतं चेतेश्वरचं करिअर

ईडीचे आरोप काय?

मालविंदर सिंग सध्या तिहार तुरुंगात आहे. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जपना सिंग यांच्या पत्नीशी कायदा सचिव म्हणून संपर्क साधल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात सुकेश दिशाभूल करणारी विधाने करत असल्याचे तसेच तपासात सहकार्य करत नसल्याचे एजन्सीने म्हटले आहे.

200 कोटींच्या घोटाळा प्रकरणात तुरूंगात आहे

सुकेश चंद्रशेखर आधीच 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून, ईडीने 2021 च्या या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सची चंद्रशेखरशी असलेल्या कथित संबंधांबद्दल चौकशी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.