नवी दिल्ली- नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त असतील. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधीपक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी याची माहिती दिली आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्ष नेता याच्या त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय घेतला आहे. (Sukhbir Sandhu Dyanesh Kumar New Election Commissioner Information given by Adhir Ranjan Chaudhary)
नऊ मार्च रोजी अरुण गोयल यांनी आयुक्त पदाचा राजीनामा दिला होता. काही खासजी कारणासाठी त्यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना ही मोठी घडामोड घोती. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयुक्ताच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या होत्या.
त्रिसदस्यीय समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी समितीच्या या आधीही बैठका झाल्या होत्या. आज दोन नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, अधीर रंजन चौधरी यांनी समितीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या समावेशावरुन टीका केली आहे.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारताचे सरन्यायाधीस या समितीमध्ये असायला हवे होते. मागील वर्षी सरकारने केलेल्या कायद्यामुळे ही समिती एक औपचारिकता ठरली आहे. समितीमध्ये सरकारचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना हवे ते करु शकतात. तीस सदस्य असलेल्या या समितीमध्ये निवडणूक आयुक्तांच्या नावांची बहुमताने निवड होत असते. दोन सदस्यांनी मंजुरी दिलेल्या नावाची निवड होत असते.
काँग्रेस नेत्याने सांगितलं की, मला काल रात्री २१२ नावे देण्यात आली होती. मी काल रात्री दिल्लीत पोहोचलो आणि आज दिल्लीत दोन वाजता बैठक झाली. एका दिवसात इतक्या सर्व नावांचा तपास कसा केला जाऊ शकतो? मला बैठकीआधी सहा नावे सोपवण्यात आली. बहुमत त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना हव्या त्या उमेदवारांची त्यांनी निवड केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.