तिरंगा रॅलीत गेल्याने सुनील भट्टची हत्या; KFF ने घेतली हत्येची जबाबदारी

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ले केले होते
KFF Terrorist Organization
KFF Terrorist OrganizationKFF Terrorist Organization
Updated on

KFF Terrorist Organization श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी (Terrorist) दोन काश्मिरी पंडितांवर हल्ला केला. त्यापैकी सुनील भट्ट यांचा मृत्यू (Killed) झाला आहे. त्याचवेळी काश्मिरी पंडित पिंटू कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काश्मीर फ्रीडम फायटर्स (KFF) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुनील भट्ट तिरंगा रॅलीला गेले होते. त्यामुळे त्यांची हत्या केल्याचे दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ले केले होते. काही दिवसांपूर्वी बडगाममध्ये झालेल्या चकमकीत दहशतवादी लतीफ रादर मारला गेला होता. यानंतर दुसऱ्यांदा नागरिकांवर दहशतवाद्यांनी (Terrorist) हल्ला केला. सुनील यांना दहशतवाद्यांनी नाव विचारून हत्या (Killed) केली, असे सांगण्यात येत आहे.

KFF Terrorist Organization
Aamir Khan : लाल सिंह चड्ढामुळे आमिरला बसला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सुनील भट्ट यांना चार मुली आहेत. सुनीलच्या हत्येने कुटुंब हादरले आहे. सुनील हे भाऊ पिंटूसोबत बागेत काम करीत होते. दहशतवाद्यांनी त्यांच्याजवळ जाऊन नाव विचारले. त्यानंतर गोळीबार केला. एक गोळी पिंटूलाही लागली, असे शेजाऱ्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. सुनील आपले काम करीत होते. तरीही दहशतवाद्यांनी त्यांना ठार मारले, असे भाजप नेते निर्मल सिंह म्हणाले. पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. केंद्रावर आरोप करताना त्या म्हणाल्या, सरकारच्या निर्णयांमुळेच जम्मू-काश्मीरमधील जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

KFF Terrorist Organization
चार महिन्यांपूर्वी मुलीचा जन्म आता पुन्हा गरोदर; देबिना बॅनर्जीचा फोटो व्हायरल

टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या

  • १२ मे - काश्मिरी पंडित राहुल भट्ट या सरकारी कर्मचाऱ्याची हत्या

  • १७ मे - बारामुल्लामध्ये ५२ वर्षीय व्यावसायिकाची हत्या

  • २५ मे - बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्टची हत्या

  • ३१ मे - कुलगाममध्ये रजनी बाला या शिक्षिकेची हत्या

  • २ जानेवारी - बडगाममध्ये १७ वर्षीय प्रवासी मजुराची हत्या

  • ४ ऑगस्ट - बिहारमधील एका स्थलांतरित मजुराची पुलवामामध्ये हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.