Super Vasuki : तब्बल साडेतीन किलोमीटर लांब आहे ही मालगाडी, का दिलं 'वासुकी' नाव वाचा

Super Vasuki: चक्क 295 डब्बे असणारी देशातील सर्वात लांब ट्रेन, वाचा
Super Vasuki:
Super Vasuki:sakal
Updated on

आज 22 डिसेंबर. आजच्याच दिवशी 1851ला भारतात पहिली मालगाडी धावली. मालगाडीचा इतिहास हा खूप मोठा आहे. ही गाडी उत्तराखंडच्या रुरकी येथून चालवली जात होती. इंजिनला आग लागल्यानंतर ही लाइन बंद झाली. त्यानंतर ही गाडी 9 महिने कार्यरत राहिली.

या दिवसाचे औचित्य साधत आज आपण भारतातील सर्वात लांब माल गाडीविषयी जाणून घेणार आहोत. (Super Vasuki Indian Railways longest freight train read story)

2022 हे वर्ष अमृत महोत्सव असणारे वर्ष आहे. भारत स्वातंत्र्य होउन या वर्षी 75 वर्षे पुर्ण झाली. यानिमित्त्याने भारतीय रेल्वेने एक अनोखा पुढाकार घेत 295 डब्ब्यांची एक विशाल मालगाडी चालवली जी रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी रेल्वेची मालगाडी म्हणून ओळखली जाते.

साडे तीन किलोमीटर लांब असलेली मालगाडी ‘सुपर वासुकी’ ही 15 ऑगस्टला छत्तीसगडच्या कोरबा पासून नागपुर पर्यंत चालवण्यात आली. हे एक प्रकारचं परीक्षण होतं. 295 डब्ब्यात 27,000 टन कोळसा भरला होता.

Super Vasuki:
Bullet Train : बुलेट ट्रेन 22 हजार खारफुटीची झाडे तोडण्यास HC ची परवानगी: पण...

रेल्वेच्या मते या मालगाडीला एक स्टेशनला पार करण्यासाठी जवळपास चार मिनटांचा अवधी लागतो. सुपर वासुकी ने जितक्या कोळश्याचा प्रवास केला तितका कोळसा 3000 मेगावाट वीज निर्माण करू शकतो.

Super Vasuki:
Types of Trains : एक्स्प्रेस, मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये फरक काय ?

एका युनिटच्या रुपात पाच मालगाड्यांच्या रेक ला मिळून ही ट्रेन बनविण्यात आली आहे. रेल्वे विभागाने सांगितले आहे की विज निमिर्ती प्लांटमध्ये जेव्हा इंधनची कमतरता असेल तेव्हा या ट्रेनचा वापर नियमित केला जाईल. या वर्षी सुरवातीलाच कोळसाच्या कमतरतेमुळे देशात विज संकट अनुभवलं होतं.

का दिलं 'वासुकी' नाव ?

वासुकी हे हिंदू धर्मातील नागांचा राजे आहेत . त्यांच्या डोक्यावर नागमणी नावाचे रत्न होता, अशी आख्यायिका बोलली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी वासुकीचं मोलाचं योगदान आहे. वासुकी हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान आहेत. ही मालगाडीही वासूकी सारखी लांब असून शक्तीशाली आहे, त्यामुळे याला वासूकी असं नाव देण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.