नवी दिल्ली : कोलकात्यातील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. ठिकठिकाणी डॉक्टरांनी संप घडवून आणला असून त्यामुळं अनेक वैद्यकीय सेवांवर विपरित परिणाम झाला आहे. सुप्रीम कोर्टानं देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.
यानंतर आता कोर्टानं या आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना पुन्हा कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जे आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांच्यावर कारवाईबाबत महत्वाचे निर्देशही दिले आहेत.